वेध माझा ऑनलाइन। जेवणाच्या पंक्तीमध्ये मटणाची नळी नसल्यामुळे तेलंगणामध्ये मुलाने चक्क लग्न मोडल्याची घटना घडली. मुलगी निजामाबादमधील राहणारी आहे तर मुलगा जगतियाल येथील राहणारा आहे. नोव्हेंबरमध्ये मुलाची घरी साखरपुडा झाला.. पण काही दिवसानंतर लग्नाच्या पंक्तीत मटणाची नळी नसल्यामुळे लग्न मोडलं गेलं. हे सर्व प्रकरण पोलिस स्टेशनमध्ये पोहचलं. पोलिसांनी वर पक्षाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही.
वधूच्या कुटुंबियांनी साखरपुड्यावेळी वर पक्षाच्या लोकांसाठी आणि उपस्थित सर्व पाहुण्यांसाठी मांसाहारी जेवणाची व्यवस्था केली. साखरपुड्यानंतर वर पक्षातील लोकांनी मटणाची नळी पंक्तीला नव्हती, असं म्हटलं. त्यानंतर वधू आणि वर पक्षाचं जोरदार भांडण झालं. त्यातच वधूकडील मंडळींनी पंक्तीला मटणाची नळी नव्हतीच, असे सांगितलं. त्यानंतर वाद आणखी वाढला. वधू आणि वर मंडळींचा वाद इतका वाढला की पोलिसांना बोलवावं लागलं. पण पोलिसांची मध्यस्थीही कामाला आली नाही, लग्न मोडलंच...
स्थानिक पोलिस स्टेशन अधिकाऱ्याने, वर पक्षातील लोकांना वाद थांबवण्याचा सल्ला दिला, पण वाद काही केल्या संपला नाही. ते म्हणाले की, ज्यावेळी सर्व बोलणी झाली तेव्हा मटणाची नळी पंक्तीत असेल, असे ठरले होते. पण ही गोष्ट मुद्दाम लपवली गेली. अखेर, मुलाकडील मंडळींनी हे लग्न मोडलं, अन् साखरपुड्याचा कार्यक्रमही अर्ध्यावर सुटला. सर्वांनी घरी जाणं पसंत केले. पोलिसांनी वराच्या घरच्यांना खूप समजावलं पण ते लग्नासाठी राजी झाले नाहीत. मटणात बोनमॅरो न दिल्याने वधूच्या पक्षाने अपमान केला, असल्याचे सांगितलं. मात्र, वधूपक्षातील लोकांचे म्हणणे आहे की, त्यांना याबाबत आधी सांगितले गेले नव्हते. त्यामुळे पंक्तीवेळी मटणात बोन मॅरो दिले नाहीत. ही बाब जेव्हा चर्चेत आली तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले कारण मटणासारख्या छोट्याशा गोष्टीवरून लग्न मोडल्याचे क्वचितच कोणी ऐकले असेल.
No comments:
Post a Comment