वेध माझा ऑनलाइन। आरबीआयच्या कार्यालयात बाँब ठेवण्यात आल्याची धमकी आल्यानतंर एकच खळबळ उडाली. ईमेलवरून बॉम्ब ठेवल्याची देण्यात आली धमकी. आरबीआय कार्यालय, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेत बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा ई मेल आला. त्यामध्ये आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. खिलाफत इंडिया या ई-मेलवरून धमकी आल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईत एकूण 11 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा एक मेल मंगळवारी दुपारी आला. दुपारी दीड वाजता हे बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याचं त्यात म्हटलं होतं. पोलिसांनी या सर्व ठिकाणी शोधमोहीम केली असता काहीही आक्षेपार्ह आढळून आल नाही. त्यानंतर एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरबीआयच्या ऑफिशिअल मेलवर बाँब ठेवल्याची धमकी देणारा मेल आल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर आरबीआयने पोलिसांनी याची माहिती दिली. मुंबई पोलिसांनी त्यांच्या बाँब स्कॉडच्या मदतीने शोध सुरू केला. पण त्यामध्ये काहीही आढळलं नसल्याचं समोर आलं. पण हा मेल कुठून करण्यात आला आणि का करण्यात आला याचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे.
या मेलमध्ये अनेक गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जगातला सर्वात मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांनी भारतीय बँकांना लुटल्याचंही म्हटलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्ही आमचं पाऊल उचलू अशी धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये अशा प्रकारचे धमकीचे मेल आणि फोन अनेकदा येतात. पण आरबीआयच्या संदर्भात मेल आल्याने पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला आहे.
मुंबई पोलिसांना यावर्षी अनेक अधिक खोटी माहिती देणारे अथवा धमकीचे कॉल आले आहेत. यापूर्वी 15 ऑक्टोबर रोजी एका व्यक्तीने ताज हॉटेल बाँबने उडवून देण्याची धमकी दिली होती. त्यानंतर 31 ऑगस्ट रोजी मंत्रालय उडवून देण्याची धमकी देणारा फोन आला होता. यानंतर, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी शोधमोहीम राबवली असता, धमकीचा फोन अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी बाळकृष्ण भाऊसाहेब ढाकणे नावाच्या व्यक्तीने केल्याचं आढळून आलं.
No comments:
Post a Comment