Tuesday, December 26, 2023

औषध व्यापारी प्रितेश मेहता (गल्या मेहता) यांची भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या कराड तालुका अध्यक्षपदी निवड : मेहता यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छाचा वर्षाव:

वेध माझा ऑनलाइन।
कराडचे औषध व्यापारी प्रितेश मेहता (गल्या मेहता) यांची भाजप च्या अल्पसंख्याक मोर्चाच्या कराड तालुका अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी याबाबतचे नियुक्तीचे पत्र श्री मेहता याना दिले आहे

प्रितेश मेहता यांच्या संघटनात्मक कार्याची दखल घेऊन त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात म्हटले आहे भाजप पक्षाचे काम तळागाळात पोचवण्यासाठी मेहता यांचे प्रयत्न महत्वाचे ठरतील व त्यामुळे संघटन आणखी मजबूत होईल अशी अपेक्षाही भाजप च्या वतीने देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आली आहे

प्रीतेश मेहता यांनी मेडिकल असोसिएशन च्या माध्यमातून अनेक उपक्रमात आपला सहभाग नोंदवला आहे कोरोना काळात घरपोच औषध व्यवस्था त्यांनी राबवली आहे तसेच गणेशोत्सव काळात प्रसाद वाटप करणे पूरपरिस्थिती मध्ये पूरग्रस्तांना कपडे वाटप करणे अशा अनेक सामाजिक उपक्रमात देखील त्यांचा सहभाग हिरीरीने राहिला आहे मेहता यांच्या नियुक्तीमुळे भाजप पक्षाच्या संघटन कार्याला नक्कीच बळकटी मिळेल असा भाजप पदाधिकाऱ्यांना विश्वास आहे  भाजप च्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या कराड तालुका अध्यक्षपदी मेहता यांची नियुक्ती झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

No comments:

Post a Comment