वेध माझा ऑनलाइन। ईशान्येकडील मणिपूर राज्यात पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. राज्यातील तेंगनौपाल जिल्ह्यात सोमवारी दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबारात १३ जणांचा मृत्यू झाला. इंटरनेटवरील बंदी हटल्यानंतर मणिूपर पुन्हा एकदा पेटले आहे.
याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, तेंगनौपाल जिल्ह्यातील लेथिथू गावाजवळ दोन गटांमध्ये गोळीबार झाला. गोळीबाराची माहिती मिळताच आमचे सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले, तेथून आम्ही १३ मृतदेह बाहेर काढले. मृतदेहांजवळ कोणतीही शस्त्रे सापडली नाहीत.
कोणिही मृतव्यक्ती या ठिकाणचे स्थानिक रहिवासी नसल्याचे सांगितले जात आहे. मणिपूर राज्यात ७ महिन्यांनंतर रविवारी (३ डिसेंबर) मोबाइल इंटरनेट सेवेवरील बंदी उठवण्यात आली होती. त्याचाच दुसऱ्या दिवशी ही घटना घडली. तर काही जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात अजूनही निर्बंध कायम आहेत.
मणिपूरमध्ये ७ महिन्यांपासून हिंसाचार-
ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला.
No comments:
Post a Comment