Friday, December 29, 2023

उद्या शनिवारी कराडमध्ये भव्य श्रीराम शोभायात्रेचे आयोजन ! मोठ्या संख्येने सामील व्हा : सकल हिंदू समाजाच्या वतीने आवाहन ;

वेध माझा ऑनलाइन।
अयोध्येमध्ये दिनांक २२ जानेवारी रोजी श्रीराम जन्मभूमी वर भगवान श्रीरामलल्लांची प्रतिष्ठापना होत आहे ... या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने भारतातील प्रत्येक गावात घरोघरी जाऊन रामसेवक या पवित्र सोहळ्याचे निमंत्रण आणि मंगल अक्षता देणार आहेत...अयोध्येहून आलेल्या या मंगल अक्षता कलशाचे दर्शन कराडकर नागरिकांना व्हावे या उद्देशाने कराड मधील सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य श्रीराम शोभायात्रेचे आयोजन  दिनांक ३० जानेवारी रोजी दुपारी ३ .३० वाजता श्री शिव तीर्थ ( दत्त चौक, कराड ) येथून करण्यात आले आहे ... 

कराड मधील विविध आध्यात्मिक सेवा संस्था - भजनी मंडळे - विविध पंथ संप्रदाय, मठ मंदिरे, गणेश उत्सव आणि नवरात्र उत्सव मंडळे तसेच सर्व हिंदुत्ववादी संघटना या सर्वांनी मिळून या श्रीराम मंगल कलश दर्शन शोभायात्रेचे नियोजन केले आहे...

ही शोभा यात्रा दत्त चौक - आझाद चौक - चावडी चौक - कन्या शाळा - श्री ज्योतिबा मंदिर - डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा - महात्मा ज्योतिबा फुले पुतळा - कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा ( स्टँड परिसर ) या मार्गे येऊन शिव तीर्थावर सांगता होईल अशी माहिती आयोजकांनी दिली आहे ...

"तरी अयोध्येहून आलेल्या या मंगल कलशाचे दर्शन घेण्यासाठी आणि ऐतिहासिक कराड नगरी मधील सर्व देवी देवतांना अयोध्येमधील या मंगल सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी कराड मधील सर्व माता भगिनी आणि नागरिकांनी पारंपरिक वेशात या भव्य शोभायात्रेत सहभागी व्हावे" असे आवाहन कराड मधील सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे...

No comments:

Post a Comment