वेध माझा ऑनलाइन। दिशा सिलियन मृत्यूप्रकरणाची एसआयटी चौकशी होणार आहे. याबाबत आमदार नितेश राणेंकडून सातत्याने आदित्य ठाकरेंवर आरोप केले जात आहेत. आदित्य ठाकरेंवरील आरोपावर बोलताना शर्मिला ठाकरे यांनी आदित्य असं काही करेल असं मला वाटत नाही. चौकशी तर कोणीही लावेल, अशी प्रतिक्रिया दिली होती,त्यानंतर आज खासदार संजय राऊतांनी शर्मिला ठाकरेंचे आभार मानले आहेत. तसेच आमदार अपात्रता सुनावणी लांबणीवर जाईल, पक्षांतराबाबत अध्यक्षांना चीड आहे असं वाटतं नाही, असे देखील राऊत म्हणाले.
आदित्यवर सगळ्यांचा विश्वास आहे. आम्ही आभारी आहोत. भाजपला मदत झाली, असे संजय राऊत म्हणाले. मनसे लोकसभा निवडणूक तयारीवर बोलताना संजय राऊत म्हणाले. भाजपला मदत झाली पाहिजे यासाठी एमआयएम, काही आघाड्या फक्त हुकूमशाही विरोधात शिव्या देतात. पण प्रत्यक्ष भूमिका घेत नाहीत.
No comments:
Post a Comment