वेध माझा ऑनलाइन। नवऱ्याचा दबाव झुगारुन एका 40 वर्षीय महिलेने तिच्या भावाला किडनी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे खवळलेल्या नवऱ्याने सौदी अरेबियातूनच Whatsapp वरुन महिलेला ट्रिपल तलाक दिला. किडनी देण्याआधी भावाकडून 40 लाख रुपये घे, अस पती या महिलेला सांगत होता. त्यासाठी तिच्यावर दबाव आणत होता. पण ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये ही महिला राहते. एकही पैसा न घेता तिने भावाला किडनी दिली. म्हणून पतीने तिला ट्रिपल तलाक दिला.
नवरा अब्दुल राशीद (44) विरोधात तरनुम्मने FIR नोंदवलाय. हुंडाविरोधी तसच मुस्लिम महिला कायदा 2019 अंतर्गत अब्दुल विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. सर्कल अधिकारी शिल्पा वर्मा यांनी ही माहिती दिलीय. कायद्याने ट्रिपल तलाकला भारतात बेकायदा आणि असंवैधानिक ठरवण्यात आलय. चारवर्षापूर्वी यासंबंधी कायदा मंजूर करण्यात आला. यात तीन वर्ष तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.
तरन्नुमचा भाऊ मोहम्मद शाकीरची किडनी फेल झाली. मुंबईत त्याच्यावर उपचार सुरु आहेत. भावाच आयुष्य वाचवण्यासाठी तिने किडनी देण्याचा निर्णय घेतला. किडनीच्या मोबदल्यात भावाकडून 40 लाख रुपये घे, म्हणून अब्दुल राशीद तरन्नुमवर दबाव टाकत होता. ‘मी नकार दिल्यानंतर त्याने ट्रिपल तलाक दिला’ असं तरन्नुमने सांगितलं.
No comments:
Post a Comment