Wednesday, December 13, 2023

पाचगणी च्या स्प्रिंग रिसॉर्ट वर नृत्यांगनांच्या नृत्यासह पार्टी ; पोलिसांचा छापा ; सातारा जिल्ह्यातील 5 डॉक्टर थिरकताना सापडले :

वेध माझा ऑनलाइन। पाचगणी- कासवंड येथे ‘स्प्रिंग रिसोर्ट’वर रात्री पोलिसांनी छापा टाकून चार युवतींसह 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील पाच डॉक्टर आणि हॉटेल मालकासह एकूण 9 जण ताब्‍यात घेतले आहेत. 
याबाबत पाचगणी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की पाचगणी जवळ असणाऱ्या कासवंड गावातील ‘स्प्रिंग रिसॉर्ट ‘ मध्ये डॉक्टरांसमोर युवतींचे बीभत्स हावभाव करत, नृत्यासह पार्टी चालू असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख आचल दलाल यांना मिळाली. त्यांनतर पोलिसांचे विशेष पथक पाचगणी कासवंड येथे रवाना करण्यात आले छापा टाकला त्यावेळी नर्तिका नाचत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी कारवाई करत चार महिला त्यांच्यासमवेत नाचणाऱ्या सहा डॉक्टर व एक फार्मासिस्ट रिसॉर्ट चालक असे एकूण नऊ जणांना ताब्यात घेतले आहे त्यापैकी सातारा जिल्ह्यातील 5 डॉक्टरांचा समावेश आहे

 विशाल सुरेश शिर्के (वय- 36 वर्ष, रा. पसरणी), उपेंद्र उर्फ कृष्णा दयावंत प्रशादकोल (वय- 31 वर्ष, रा. स्प्रिंग व्हॅली रिसॉर्ट, कासवंड), डाॅ. रणजीत तात्यासाहेब काळे (वय- 43 वर्षे, रा. बाजार पटांगण दहिवडी), डाॅ. निलेश नारायण सन्मुख (वय- 39 वर्षे. लक्ष्मी मार्केट ,मिरज, जि. सांगली), प्रवीण शांताराम सैद (वय- 40 वर्ष. रा. आलडीया, माळुंगे पाडळे, पुणे), डाॅ. मनोज विलास सावंत (वय- 40 वर्षे, रा. जयवंत नगर ,दहिवडी), डाॅ. महेश बाजीराव साळुंखे (वय- 40 वर्षे, रा. मलकापूर- कराड), डाॅ. राहुल बबन वाघमोडे (वय- 31 वर्षे रा. गोंदवले), हनुमंत मधुकर खाडे (वय- 65 वर्षे, रा. दहिवडी) अशा नऊ जणांवर पांचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेची फिर्याद उमेश रामचंद्र लोखंडे (वय 32 वर्ष) पोलीस कॉन्स्टेबल यांनी पांचगणी पोलिसात दिलीं आहे. अधिक तपास पांचगणी पोलीस ठण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेश माने करीत आहेत.


No comments:

Post a Comment