Wednesday, December 13, 2023

कराड उत्तर व दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शरद पवारांचा वाढदिवस साजरा

वेध माझा ऑनलाईन। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, भारताचे माजी कृषिमंत्री आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार माननीय श्री बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार कराड उत्तर व दक्षिण मधील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्यावतीने कराड येथील सौ वेणूताई चव्हाण स्मारक ट्रस्ट कराड येथे कराडचे ज्येष्ठ नागरिक व प्रगतशील शेतकरी श्री बबनराव बोजगावकर (आबा) यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

 यावेळी कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  देवराज पाटील (दादा), सातारा जिल्हा सहकारी पाणी पुरवठा फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश पाटील (बापू), सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक लालासाहेब पाटील (कवठेकर), माजी सनदी अधिकारी तानाजीराव साळुंखे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस महिला सरचिटणीस सौ संगीता साळुंखे (माई), राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष गंगाधर जाधव, कराड तालुका महिला अध्यक्षा सौ. सुरेखा डूबल, कराड शहर अध्यक्ष नंदकुमार बटाणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव, कराड पंचायत समितीचे माजी सभापती प्रणव ताटे, माजी उपसभापती बबनराव पवार, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष शंकरराव खापे (बापू), कराडच्या माजी नगराध्यक्षा विद्याराणी साळुंखे, कृषी उत्पन्न बाजार समिती कराडचे माजी सभापती दाजी पवार, कराड पंचायत समितीचे माजी सदस्य तथा कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेस कराड शहराध्यक्ष पोपटराव साळुंखे, कराडचे माजी नगरसेवक ॲड. मानसिंगराव पाटील, ॲड. प्रतापराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते नाना खामकर, श्रीमती जयश्री मर्ढे, बाळासाहेब पवार, जयंत बेडेकर, कमलाकर कांबळे, दाऊद आंबेकरी, सोहेब सुतार, अख्तर आंबेकारी, दिलीपराव थोरात, वैजनाथ थोरात, मिलिंद चव्हाण, डॉ. रमेश जाधव, सुनील जगदाळे, संजय पिसाळ, संजय घोलप, प्रवीण (दादा) थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस कराड दक्षिणचे अध्यक्ष संतोष पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस संपर्कप्रमुख सुहेल बारस्कर, प्रकाश पवार (आण्णा), पराग रामुगडे, मोहम्मद आवटे, रसूल मुजावर, युवराज भोईटे, अनुज पाटील, युवराज शिंदे, अनिल चव्हाण, दत्तात्रय शेलार, सिद्धार्थ चव्हाण, प्रताप चव्हाण, आर.जी.तांबे, किशोर पावशे, बजरंग पाटील, धनंजय कुंभार यांच्यासह कराड उत्तर व दक्षिण मधील पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment