Monday, January 6, 2025

लाडकि बहिण योजना : ‘या’ महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार !

वेध माझा ऑनलाईन - 
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने घोषित केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या निकालात चांगलीच गेम चेंजर ठरली. त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात.  राज्यात प्रचंड लोकप्रिय झालेल्या या योजनेसाठी जवळपास अडीच कोटी महिलांनी अर्ज केले. त्यानंतर जुलैपासून या बहिणींना दर महिन्याला १५०० रुपये देण्यास सुरुवात झाली. दरम्यान निवडणुकीत विजय झाल्यानंतर लाभार्थी महिलांना १५०० रूपये मिळणारा हफ्ता वाढवून २१०० रूपये करणार असल्याचे वक्तव्य महायुतीच्या नेत्यांनी केलं होतं. दरम्यान महायुतीचं सरकार पुन्हा राज्यात आल्यानंतर २१०० रूपयांचा हफ्ता कधी याकडे साऱ्या लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं असताना महायुती सरकारमधील मंत्र्यानं मोठं वक्तव्य केले आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. मार्च महिन्यानंतरच लाडक्या बहिणींचा हप्ता १५०० रुपयांवरून २१०० रुपये होणार. अर्थ संकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळतील असं वक्तव्य जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. नेवासा येथे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात विखे पाटील यांनी हे विधान केलं.

No comments:

Post a Comment