बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर आठ महिन्यांपूर्वी आर्थिक गुन्हा दाखल आहे. त्यानंतर त्याच्यावर अंमलबजावणी संचालनालय आणि पीएमएलए नुसार कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु आठ महिने झाल्यानंतरही त्याच्यावर कारवाई झाली नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. एकीकडे पुरावे नसताना अनिल देशमुख आणि संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई झाली होती, परंतु वाल्मिक कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल असताना कारवाई का नाही? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.
No comments:
Post a Comment