वेध माझा ऑनलाइन
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला महिना होत आला तरी या प्रकरणात अनेक घडामोडी सुरु आहेत. या प्रकरणी गेल्या महिन्याभरापासून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच त्यांच्या राजीनाम्यासाठी दिवसेंदिवस विरोधकांसह सत्ताधारी आमदार देखील आक्रमक होत आहेत.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची आज छत्रपती संभाजी राजे यांच्यासह अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, ज्योती मेटे, सुरेश धस, बीडचे खासदार आमदारांनी भेट घेतली आहे.सर्वांची मागणी एकच आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासावर परिणाम होऊ नये म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, असं भाजप आमदार सुरेश धस यांनी म्हटलं आहे. सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटत मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचं सांगितलं आहे.
सुरेश धस काय म्हणाले?
संभाजीराजे यांनी सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे धस म्हणाले. स्वपक्षाची कुठेही नाराजी नाही. मी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतही बोलणार आहे. मी मात्र संतोष देशमुखबद्दल बोलणं थांबवणार नाही असेही धस म्हणाले. अजितदादांवर काय टीका केली, त्यांना लागायचं काय कारण आहे, असंही धस म्हणाले.
माझ्याकडून अनवधानाने एक शब्द अरे तुरे केला तो शब्द परत घेतलाय. अजित दादांवर माझा हक्क आहे अरे तुरे बोलण्याचा असेही धस म्हणाले. अजित पवार यांच्यासोबत मी फार काळ काम केले आहे. अधिकार वाणीने मी त्यांचा एकेरी उल्लेख केला होता असे सुरेश धस म्हणाले. एक नैतिक जबाबदारी म्हणून अरे तुरेची भाषा करायला नको होती, मी दिलगिरी व्यक्त करतो असेही सुरेश धस म्हणाले.
No comments:
Post a Comment