Saturday, January 11, 2025

महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून स्वबळाचा नारा ; काय म्हणाले संजय राऊत?

वेध माझा ऑनलाईन
राज्यातील लोकसभा, विधानसभा निवडणुकांनतर आता महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. येत्या महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाने स्वबळावर लढण्याचा घेतला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्वत: त्याबद्दलची घोषणा केली आहे
संजय राऊत काय म्हणाले?
“मुंबईसह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल. एकदा आम्हाला पाहायचंच आहे. नागपूरलाही आम्ही स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरेंनी आम्हाला तसे संकेत दिले आहेत. आताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आता असं आमचं ठरतंय की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल… कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार. आघाडीमध्ये लोकसभा, विधानसभेत कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला किंबहुना पक्षाच्या वाढीला बसतो. महापालिका, जिल्हापरिषद आणि नगरपंचायतीत स्वबळावर लढून आपपले पक्ष मजबूत करावेत”, असे संजय राऊत म्हणाले.

No comments:

Post a Comment