वेध माझा ऑनलाइन
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासाला चांगलीच गती आली आहे. देशमुख यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या संशयाखाली वाल्मिक कराड यांच्यावर मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाल्मिक कराड हे राज्याचे नागरी व अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे आता याप्रकरणात धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे.
वाल्मिक कराड यांच्यावर मकोका लागल्यानंतर मंगळवार संध्याकाळी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाली. अवघ्या 10 मिनिटांची चर्चा झाल्यानंतर धनंजय मुंडे या बैठकीतून बाहेर पडले. यानंतर धनंजय मुंडे थेट परळीच्या दिशेने रवाना झाल्याचे सांगितले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी ते महायुतीच्या सर्व आमदारांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे इतका महत्त्वाचा कार्यक्रम सोडून धनंजय मुंडे परळीला का गेले, यावरुन आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
No comments:
Post a Comment