वेध माझा ऑनलाइन
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गु्न्ह्यात वाल्मिक कराड सध्या सीआयडी कोठडीत आहे. वाल्मिक कराडने कोर्टाकडे अर्ज करत खास सुविधेसाठी हात जोडले होते. मात्र, कोर्टाने वाल्मिक कराडला दणका दिला आहे. तुरुंगात आहात, त्यामुळे शासकीय सुविधाच वापरण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.
खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याने कोर्टाकडे आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत तुरुंगात 24 तास मदतनीसाची मागणी केली आहे. वाल्मिक कराडने आपल्या आजारपणाचे कारण देत ही मागणी केली आहे. वाल्मिक कराडने आपल्यासाठी मदतनीस कोण असावा, याचे नावही कोर्टाला दिले होते. वाल्मिक कराडच्या विनंती अर्जावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी आपला निकाल सुनावला आहे.
न्यायालयाने म्हटले की...
वाल्मिक कराडच्या अर्जावर न्यायालयाने केवळ शासकीय व्यक्तीकडून मिळणार सुविधा मिळणार असल्याचे स्पष्ट केले. आपल्याला स्लीप ॲपनिया नावाचा आजार झाला असल्याचा दावा वाल्मिक कराडने आपल्या अर्जात केला होता. याच आजारातील उपचाराचा एक भाग म्हणून खाजगी व्यक्ती काळजीवाहू म्हणून देण्याची विनंती वाल्मिक कराडने केली होती. या आजारातील उपचारासाठी सी पॅप मशीन चालवण्यासाठी खासगी मदतनीस देण्याची मागणी केली होती. मात्र, कोठडीत असल्याने खासगी व्यक्तीचा वापर करता येणार नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. फक्त शासकीय सुविधा देण्याची सूचना देखील कोर्टाने केली.
वाल्मिक कराडने कोर्टाला केलेल्या विनंतीत म्हटले की, आपल्याला स्लिप एपनिया नावाचा आजार असून या आजारासाठी ऑटो सीपॅप नावाची मशीन विशिष्ट दाबाने वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. ही मशीन चालवण्यासाठी आपल्याला सीआयडी कोठडीत 24 तास मदतनीस देण्यात यावा, अशी विनंती वाल्मिक कराडने केली आहे.
No comments:
Post a Comment