वेध माझा ऑनलाइन
सातारा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून किमान तापमानात उतार आला असून, महाबळेश्वरला १३.८ तर सातारा येथे १४.८ अंशांची नोंद झाली. तर चार दिवसांत साताऱ्याचे किमान तापमान चार अंशांनी घसरले आहे. यामुळे सातारा शहरासह जिल्ह्यात पुन्हा थंडीची तीव्रता वाढू लागली आहे. जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या मध्यावर थंडीचा कडाका पडला होता. त्यातच उत्तर भागातून शीतलहर होती. त्यामुळे किमान तापमानात सतत उतार येत गेला. परिणामी सातारा शहराचा पारा ९.५ अंशांपर्यंत घसरला होता. हे तापमान मागील तीन वर्षातील तीन नीच्चांकी ठरले होते. याचदरम्यान, जागतिक पर्यटनस्थळ असणाऱ्या महाबळेश्वरचेही किमान तापमान ११ अंशांपर्यंत उरतले होते. यामुळे थंडीची लाट आल्यासारखी स्थिती होती.
No comments:
Post a Comment