वेध माझा ऑनलाइन
सातारा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. दरम्यान, बुधवारी
सातारा शहरात १४.९, तर महाबळेश्वरला १२.९ किमान तापमानाची नोंद झाली.
दरम्यान मागील चार दिवसांपूर्वी महाबळेश्वरपेक्षा साताऱ्यात थंडीची परिणामकारकता अधिक होती. सायंकाळी सहा वाजलेनंतरच थंडी जाणवायला सुरुवात होते. रात्री दहानंतर तर कडाक्याची थंडी पडत आहे. सकाळी नऊ वाजले तरी अंगातून थंडी जात नाही, अशी स्थिती आहे. यामुळे दुपारी १२ नंतरही अंगाला गारवा झोंबत असल्याचे चित्र आहे. अजूनही काही दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.
No comments:
Post a Comment