Thursday, January 9, 2025

वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या ! ;एका खडणी प्रकरणात वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने तपासणार !;

वेध माझा ऑनलाइन
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी कारवाईला वेग आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत एकूण ९ आरोपींना अटक केली आहे. कृष्णा आंधळे एकमेव आरोपी फरार आहे. फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. दरम्यान, अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडने पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधला होता, अशी कबुली काही दिवसांपूर्वी विष्णू चाटे यानं दिली होती. आता या प्रकरणात वाल्मिक कराडभोवती कारवाईचा फास आणखी घट्ट होण्याची शक्यता आहे.आज बुधवारी वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने तपासले जाणार आहे. वाल्मिक कराड याने खंडणी प्रकरणात फोनवरून पवनचक्की कंपनीच्या मॅनेजरला दोन कोटींची खंडणी मागितली होती, असा आरोप आहे. याप्रकरणी कंपनीच्या अधिकाऱ्याने गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात आता वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने तपासले जाणार आहेत, अशी खात्रीशीर माहिती आहे.

No comments:

Post a Comment