वेध माझा ऑनलाइन
शिवसेना नेता आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देण्यात आली आहे. एका 24 वर्षीय तरुणाने जिवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यासंदर्भातील पोस्ट त्याने सोशल मीडिया अकाऊंटवर केली आहे. त्यानंतर शिवसेना पदाधिकारी आक्रमक झाले आहे. त्यांनी त्या तरुणावर गुन्हा दाखल करुन अटक करण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाणे गाठले. अखेर पोलिसांनी त्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा तरुणाचे नाव हितेश प्रभाकर धेंडे (वय-24 ) आहे. तो ठाण्यातील श्रीनगर वारली पाडा या भागात राहतो. त्याने एकनाथ शिंदे यांना जीव मारण्याची धमकी देणारी पोस्ट इंस्टाग्रामवर टाकली. त्यासंदर्भात व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यासंदर्भात बोलताना ठाण्यातील शिवसेना पदाधिकारी म्हणाले, धेंडे याने एकनाथ शिंदे साहेबांना जीवे मारण्याची धमकी दिली. शिविगाळ करणारी पोस्ट टाकली. रात्री त्यांचा घरावर गोळीबार करणार अशी पोस्ट त्याने इंस्टग्रामवर केली होती.
हितेश धेंडे या तरुणावर गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसैनिक श्रीनगर पोलीस स्थानकाबाहेर मोठ्या संख्येने जमा झाले. त्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी फिर्याद दिली आहे. त्यावरुन त्याच्यावर श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस त्या तरुणाचा शोध घेत आहेत
No comments:
Post a Comment