Saturday, January 11, 2025

जरांगे-पाटील धंनजय मुंडेंना म्हणाले...तुझी मस्ती जिरवल्याशिवाय शांत बसणार नाही ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन
दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी आजा धाराशिव जिल्ह्यात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, खासदार बजरंस सोनवणे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार सुरेश धस यांच्यासह अनेक आमदार स्थानिक लोकप्रतिनीधींनी आक्रमक भाषण करत आपली भूमिका मांडली. आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी खासदारांनी केली. तर, बजरंग सोनवणे, सुरेश धस यांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्यावर हल्लाबोल केला. या मोर्चात सर्वात शेवटी भाषण करताना मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर  जोरदार हल्लाबोल केला. 
धनंजय मुंडेंबाबत जरांगे म्हणाले
मनोज जरांगे यांनी धाराशिव जिल्ह्यातील काही गुन्हेगारी घटनांचा उल्लेख करत गृहमंत्री व धनंजय मुंडेना लक्ष्य केलं. धनंजय मुंडे हा मनोज जरांगे भीत नसतो, तुझ्या गुंडाना शांत कर. जर तुझ्यामुळे मराठा, दलित, मुस्लिम ओबीसीला त्रास झाला तर 25 जानेवारी नंतर तुझी मस्ती जिरवल्याशिवाय शांत बसणार नाही, अशा शब्दात जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडेंना इशारा दिला आहे. दरम्यान, बीड सरपंच हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या सर्वच आरोपींवर आज पोलीस प्रशासनाकडून मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे, मुख्यमंत्र्‍यांनी सभागृहात दिलेल्या माहितीनुसार आरोपींविरुद्ध आज मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

No comments:

Post a Comment