Sunday, January 5, 2025

माधव भंडारी म्हणाले...ब्राह्मण समाजाला आरक्षणाची गरज नाही ;

वेध माझा ऑनलाइन
ब्राह्मण समाजाने कोणताही न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. स्वतंत्र भारताच्या जडणघडणीत ब्राह्मण समाजाचा वाटा दुर्लक्ष करण्यासारखं नाही. देशातील उद्योगांच्या उभारणीत ब्राह्मण समाजाचे योगदान खूप मोठं आहे. देशात समाज सुधारण्यासाठीच्या चळवळी झाल्या त्या उभ्या करणारे बहुतेक ब्राह्मण होते. त्यामुळे आपल्याला आरक्षणाची गरज नाही. आम्ही जिथे जाऊ तिथे आमचे स्थान निर्माण करू असे भाजप नेते माधव भंडारी यांनी म्हटलं. कल्याण ब्राह्मण सभेतर्फे अत्रे नाट्यगृहात राज्यभरात निवडून आलेल्या ब्राह्मण आमदारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यात भंडारी बोलत होते

महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा भव्य सत्कार सोहळा कल्याणमध्ये आयोजित करण्यात आला होता. कल्याण ब्राह्मण सभेतर्फे कल्याणच्या आचार्य अत्रे सभागृहात या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार किरण सामंत, संजय केळकर, भाजप नेते माधव भंडारी, सांगलीचे आमदार  सुधीर गाडगीळ, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले, बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय, उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

No comments:

Post a Comment