वेध माझा ऑनलाइन।
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. सध्या वाल्मिक कराड यांना चौकशीसाठी सीआयडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी देखील सुरु आहे. पण हे वाल्मिक कराड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची वारंवार मागणी केली जात आहे. धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी धनजंय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर आरोपी कुठेही गेले असतील, कोणीही मदत केली असली तरी त्यांच्यावर कारवाई सुरु आहे हे दिसतंय. मदत करणाऱ्यांनाही आम्ही सोडत नाहीय. या प्रकरणाचा वापर राजकारणासाठी करु नये, सरपंचाची हत्या झाली आहे. त्या हत्येचं राजकारण होऊ नये, तर समाजात काहीतरी सुधार व्हावा...असा आमचा प्रयत्न आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
No comments:
Post a Comment