Sunday, January 5, 2025

धनंजय मुंडे,पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून मानसिक छळ होतोय ;अंजली दमानिया यांचा आरोप ; मुख्यमंत्री फडणवीस यांची भेटण्यासाठी मागितली वेळ ;

वेध माझा ऑनलाइन
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे  सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीडमधील दंडेलशाहीविरोधात सातत्याने आक्रमक पवित्रा घेतलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केला आहे. संतोष देशमुख हत्येनंतर अडचणीत सापडलेल्या मंत्री धनंजय मुंडे आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड मानसिक छळ होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या संदर्भात आज (5 जानेवारी) पत्रकार परिषद घेणार असल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे.

दमानिया यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले की, मी आज दुपारी 12 वाजता माझ्या निवासस्थानावरून पत्रकार परिषद घेणार आहे. प्रचंड प्रमाणात मानसिक छळ केल्याचा आरोप करत दमानिया यांनी ते कोण आहेत त्याचा खुलासा करणार असल्याचे म्हटले आहे. माझा प्रचंड छळ केला जात असून या संदर्भात वरिष्ठांना भेटणार असल्याचेही सांगितले. असा महाराष्ट्र आहे का? अशी विचारणाही दमानिया यांनी केली.  दरम्यान, आपण पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला आणि तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना माहिती दिली आहे. दोघांच्या भेटीची वेळ मागितली असून मी पत्रकार परिषदेत सविस्तर बोलेन, असे त्यांनी सांगितले

No comments:

Post a Comment