Friday, January 10, 2025

घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यास कराडात अटक;चोरट्यास कार्वे नाक्यावर पकडले

वेध माझा ऑनलाईन
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कातरखटाव येथील घरफोडी प्रकरणातील
आरोपीस वडुज पोलिस ठाण्यातील पोलीसांनी आज अटक केली. कराड येथील कार्वे नाका येथे पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून ताब्यात घेतले.

इब्राहीम शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कातरखटाव येथील रमेश मारुती बागल यांच्या बंद घराच्या दरवाजाची कडी उघडुन आरोपीने आतमध्ये प्रवेश करुन घरातील कपाटाचे लॉकर तोडून अंदाजे ६ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम तसेच दि. १५ रोजी दुपारी तडवळे येथील नवनाथ मूरलीधर ढोले यांच्या बंद घराचा कोयंडा तोडुन घरात प्रवेश केला.
कपाटातील ३ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरुननेल्याने अज्ञात चोरट्यां विरूध्द वडुज पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होते. सदर घरफोडीची माहिती मिळताच वडूज पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. तांत्रिक आणि गोपणीय माहितीच्या आधारे तपासादरम्यान सदरचा गुन्हाआरोपी इब्राहीम अबास अली शेख याने केले असल्याची माहिती प्राप्त झाली. वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस पथकाने कराड, कडेगाव याठिकाणी सतत 3 दिवस अहोरात्र सध्या वेशातील संशयीत इब्राहीम शेख याचा नवीन राहण्याचा पत्ता व बसण्याच्या ठिकाणाची माहिती प्राप्त करुन सदरचा आरोपी हा त्याचे मोटार सायकलवरुन त्याचे मूळ गावी विजापूर राज्य – कर्नाटक येथे जात असल्याची माहिती मिळाली.
त्याचा कराड येथील कार्वे नाका परिसरात पाठलाग करुन त्यास ताब्यात घेवून सखोल  विचारपूस केली. त्यानंतर त्याने दोन्ही गुन्हे केल्याचे कबूल केले. त्यास अटक करुन चोरीस गेलेले मणी मंगळसूत्र, सोन्याचा हार, सोन्याची बोरमाळ, कानातील सोन्याचे झूमके व वेल, दोन सोन्याच्या अंगठया व रोख रक्कम आणि सोन्याची बोरमाळ, दोन सोन्याच्या अंगठया व रोख रक्कम असा गुन्हयातीलएकूण ९ तोळे सोन्याचा ऐवज व ७०००/ – रोख रक्कम असा दोन्ही गुन्हयातील १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment