वेध माझा ऑनलाइन
खंडणी मागितल्याप्रकरणी सीआयडीच्या ताब्यात असलेल्या वाल्मिक कराड यांना मंगळवारी मोठा झटका बसला. केज सत्र न्यायालयाने काल (14 जाने.) वाल्मिक कराड याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटाच्या सहभागात संशयित म्हणून वाल्मीक कराडवर मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला असून वाल्मिक कराडला पुन्हा बीड जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर वाल्मिक कराडला रुग्णालयात नेण्यात आले होते. यावेळी वाल्मिक कराडची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली. त्यामुळे रुग्णालयात त्याची ईसीजी देखील करण्यात आली. रुग्णालयातील सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर वाल्मिक कराडला पुन्हा बीड कारागृहात नेण्यात आले. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर बाहेर पोलिसांची व्हॅन उभी होती. तसेच पोलीस आणि माध्यमांचा गराडा देखील मोठ्या प्रमाणात रुग्णालयाबाहेर होता. यावेळी वाल्मिक कराड रुग्णालयाबाहेर येताच रोहित कुठंय?, असा प्रश्न केला. साधारण दोन ते तीन वेळा रोहित कुठेय, असं वाल्मिक कराडने विचारले. त्यामुळे वाल्मिक कराड विचारत असलेला रोहित नेमका कोण आहे?, याची चर्चा सध्या रंगली आहे.
No comments:
Post a Comment