Thursday, January 16, 2025

चोर लिफ्ट ने सैफच्या घरात आला; मात्र...लिफ्ट चा एक्सेस फक्त घरच्या लोकांना माहीत होता, मग चोराला अक्सीस कसा मिळाला; पोलिसांचा त्या ड्रीष्टीने तपास सुरू :

वेध माझा ऑनलाइन
अभिनेता सैफ अली खानच्या घरात आलेला चोर हा इमारतीतील प्रायव्हेट लिफ्टच्या माध्यमातून आत आला असल्याचं समोर आलं आहे. प्रायव्हेट लिफ्टचा अॅक्सेस हा फक्त सैफच्या घरातील व्यक्तींनाच माहीत आहे. अॅक्सेसशिवाय ही लिफ्ट ऑपरेट होत नाही. त्यामुळे घरातीलच व्यक्तीने हा हल्ला केला की काय असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस त्या दृष्टीने तपास करत आहेत. सैफ अली खानच्या घरी चोराने प्रवेश केला आणि त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. सैफ अली खानवर शस्त्रक्रिया झाली असून त्यांनी त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती आहे. 

सैफ अली खानच्या इमारतीमध्ये दोन लिफ्ट असल्याची माहिती आहे. एक कॉमन लिफ्ट आहे तर एक सैफच्या परिवारासाठीची प्रायव्हेट लिफ्ट आहे. प्रायव्हेट लिफ्टमधून थेट सैफच्या घरामध्ये प्रवेश मिळतो.  पण या प्रायव्हेट लिफ्टमध्ये प्रवेश करण्यासाठी अॅक्सेस कार्डची गरज असते. त्याशिवाय ही लिफ्ट ऑपरेट होत नाही. 
चोराने या प्रायव्हेट लिफ्टच्या माध्यमातून सैफच्या घरात प्रवेश केला. त्यावेळी सैफच्या घरामध्ये काम करणाऱ्या मोलकरीनीशी त्याचा सामना झाला. या प्रायव्हेट लिफ्टचा अॅक्सेस चोराला कसा मिळाला हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. त्यामुळे चोराला घरातीलच कोणत्या व्यक्तीने मदत केली की काय असाही संशय व्यक्त केला जात आहे.

No comments:

Post a Comment