Thursday, January 9, 2025

गेमचेंजर किंगमेकर- रामकृष्ण वेताळ साहेब....

वेध माझा ऑनलाइन।
स्वतःला काही मिळवण्यासाठी अनेक जण आज राजकारणामध्ये प्रवेश करतात. मात्र इतरांना काही देण्यासाठी समाजाचे,ऋण फेडण्यासाठी राजकारणामध्ये प्रवेश करणारे लोक अगदी हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच आज शिल्लक आहेत. यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना खरा समाजकारणी म्हणून रामकृष्ण वेताळ साहेब यांचा चेहरा समाजापुढे येत आहे....
देणाऱ्याने देत जावे 
घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणाऱ्याचे हातही घ्यावे...
 अशी सुंदर चारोळी महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध आहे.ही चारोळी अनेकांची पाठ आहे. परंतु या चार ओळी प्रमाणे जीवन जगणे खूप अवघड असल्याने त्याप्रमाणे जगण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही. प्रवाहाच्या विरुद्ध पोहणे खूप अवघड असते.म्हणून अनेक जण पोहणे सोडून देतात.मात्र रामकृष्ण वेताळ साहेब यांनी हाच मार्ग  त्यांनी आपल्या जीवनाची दिशा बनवला आहे.
    त्यामुळे काही मिळवण्यासाठी नाही तर फक्त इतरांना देण्यासाठी त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे.त्याचे एक साधेसुधे उदाहरण आहे.मागील जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ते स्वतः निवडणूक लढवत होते.त्याचबरोबर इतरांचा भारही ते उचलत होते.कराड उत्तर हा काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे.आणि या मतदारसंघांमध्ये इतरांना यश मिळणारच नाही!अशी अनेकांची धारणा होती.या धारणेला प्रथम मूठमाती देण्याचे काम रामकृष्ण वेताळ यांनी करून दाखवणे.
   त्यांच्याच नेतृत्वाखाली कराड उत्तर मध्ये एक जिल्हा परिषद सदस्य,दोन पंचायत समिती सदस्य भाजपा च्या कमळ चिन्हावर निवडून आले. त्याचबरोबर प्रत्येक मतदार संघात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी लक्षात राहतील अशी घवघवीत मते मिळाली.याच घटनेने त्यांची ओळख गेम चेंजर किंग मेकर अशी झाली. 
    यानंतर ज्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही.स्वतःसाठी काही मिळवायचे आहे.असा प्रयत्न त्यांनी केला नाही.जे हवे आहे ते इतरांसाठी यासाठीच ते धडपडत राहिले.स्वतःच्या व्यवसायाची घोडदौड अबाधित राखत त्यांनी राजकारणामध्ये यशस्वी मजल मारण्याचा प्रयत्न केला.लग्न,वाढदिवस,सुखदुःखाचे प्रसंग,यात्रा या सर्वांना हजेरी लावत त्यांनी लोकसंग्रह करण्याचा प्रयत्न केला. ग्रामपंचायत निवडणुका,सोसायटीच्या निवडणुका यामध्ये गावागावात सक्षम नेतृत्वाची फळी निर्माण करून त्यांना सहाय्य केले.प्रसंगी पदारमोडे केली. यामुळे कराड उत्तर मतदार संघातील वातावरण हळूहळू बदलत गेले. गावागावात ग्रामपंचायतचे,सोसायटीचे सदस्य भाजपाचे दिसू लागले आणि भाजपांला उत्तरेत नवी उभारी मिळत गेली. त्यांनी आपल्या कार्य कौशल्यातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मरळी भगतवाडी रस्ता,शिवडे भवानवाडी रस्ता सुर्ली ते कामथी पाचुंद रस्ता, गजानन हाउसिंग सोसायटी विरवडे करवडी रस्ता असे हजारो कोटी रुपयांचे रस्ते मंजूर करण्यामध्ये आपले सक्रिय योगदान दिले आहे.त्याचबरोबर शामगाव शेती पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी उपसा जलसिंचन योजना कशी राबवता येईल याबाबत सविस्तर माहिती शासन स्तरावर पुरवली असल्याने ही कामे सध्या गतिमान असल्याचे पाहायला मिळते.
    भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे त्यांना सरचिटणीस पद मिळाले.या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न उचलून धरले.अनेक युवकांना किसान मोर्चाशी जोडून विविध पदे मिळवून दिली.मानाच्या आणि लोकहिताचे काम होत असलेल्या पदावरती अनेकांना काम करण्याची संधी देऊन त्यांनाही नावलौकिक प्राप्त करून दिला.यावर्षी पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक त्यांनी या मतदारसंघात प्रयत्नांची पराठा केली. राजकारणामध्ये रामकृष्ण वेताळ साहेब यांचे आयडॉल हे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे आहेत आणि खासदारकीच्या निवडणुकीत आपल्या राजकीय आयडालला सहकार्य करण्याची संधी त्यांना मिळाली.या संधीचे सुवर्णसंधीत रूपांतर करण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. गावोगावी गाठीभेटी आणि दौरे करून महाराजांच्या यशामध्ये खारीचा वाटा उचलला.त्यामुळे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी रामकृष्ण वेताळ यांचे कार्य कौशल्य जाण त्यांना आपले शिलेदार बनवले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक त्यांनी कराड उत्तरचे नवनिर्वाचित आमदार म्हणून दादा घोरपडे यांच्या विजयासाठी पायाला भिंगरी बांधून प्रचार केला आहे.या वेळेस हेवेदावे विसरून एकत्र राहणे कसे गरजेचे आहे.यश मिळाले तर किती आनंद होईल आणि किती दिवसाच्या परिश्रमाचे साफल्य होईल हे त्यांनी युवकांना,मध्यमवर्ग यांना पटवून दिले.मी स्वतःच उमेदवार आहे असे समजून काम करीत रहा.हे लोकांना पटवून दिले.त्यांनीच बूथ कमिट्या,पन्ना प्रमुख यासारखे अनेक पदाधिकारी निर्मिती केली. प्रत्येकाशी वैयक्तिक लोकसंपर्क ठेवला होता.त्यामुळे निवडणुकीच्या अखेरपर्यंत ते सक्रिय राहून विजयी वाटचाल यशस्वी करण्यात अग्रेसर राहिले. त्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांचा ओघ वाढत आहे.परिणामी समाजकारणामध्ये गेम चेंजर किंग मेकर अशी त्यांची प्रतिमा दिवसेंदिवस वाढत गेली आहे.गावागावात लहान मुलांपासून पोरांच्या तोंडी त्यांचे नाव सातत्याने येत आहे.यासाठी फक्त त्यांनी घेतलेले परिश्रम हे एकच तत्व उपयोगी पडले आहे.म्हणूनच मागील 60 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या या मतदारसंघात परिवर्तन घडवणे शक्य झाले आहे.या मतदारसंघात परिवर्तन कधी होणारच नाही अशीच अनेकांची धारणा होती.परंतु प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे.... याची पूर्ण जाणीव असलेले रामकृष्ण वेताळ थांबायला तयार नाहीत. त्यांनी मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीत पराभूत करता येते हे हे समाजाला आपल्या परिश्रमाने दाखवून दिले.जिद्द,चिकाटी,परिश्रम यापुढे कोणतेही यश अशक्य नाही.याची जाणीव त्यांना लहानपणापासूनच आहे.याच जाणीवे नुसार ते आज पर्यंत काम करीत आहेत. हार होईल अथवा जीत होईल.हार झाली तर खचून जायचे नाही आणि जीत मिळाली तर हुरळून जायचे नाही.आपले काम खंड चालू ठेवायचे. असा त्यांचा खाक्या असल्यामुळे आज पर्यंत ते यशस्वी मार्गावरून वाटचाल करत आहेत. त्यांच्या यशाचे गमक आज अनेकांनी जाणल्यामुळे कराड उत्तर मतदार संघातील लोकांच्या मते त्यांची प्रतिमा गेम चेंजर किंग मेकर अशीच बनवली आहे.भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ते सध्या किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस या पदावर कार्यरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे विचार आणि कार्य लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी ते नेहमी कार्यरत असतात.ते सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले,सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले,ग्राम विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यात आणि विशेषता कराड उत्तर मतदार संघामध्ये भारतीय जनता पार्टीचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी कार्यरत आहेत.वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या सूचनेनुसार पक्षाची ध्येय धोरणे लोकांपर्यंत पोहोचवून आपली किंगमेकर ही ओळख अबाधित ठेवण्यात त्यांना यश मिळेल यात तिळमात्र शंका नाही. अशा या सर्व काही झोकून देणाऱ्या समाजकारणी नेत्याचा 10 जानेवारी हा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा होत आहे.या वाढदिवसानिमित्त त्यांना जनतेकडून आणि श्रीमंत रामकृष्ण वेताळ प्रेमी नागरिकांच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

शब्दांकन संदीप कोरडे

No comments:

Post a Comment