मलकापुरातील हौसाई विद्यालयात विविध गुणदर्शन सोहळा नुकताच संपन्न झाला.
या सोहळ्याचे उद्घाटन मलकापूर नगरीच्या माजी नगरसेविका अनिता यादव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश पाठक, सैनिक विभागाच्या मुख्याध्यापिका पवार मॅडम, पाटील मॅडम, कल्याण कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी लावणी, देशभक्तीपर गीते, लहान मुलांची बडबड गीते, कृष्ण भक्तीची गीते, मराठी गीते विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आली.
कार्यक्रमास विद्यार्थी व पालकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. यावेळी ऋषिकेश पोटे, अंजना जानुगडे, बालाजी मुंडे, वीरभद्र कुरपे, विकास शिंगाडे इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment