कराड नगरपरिषदेचे मा.उपनगराध्यक्ष गटनेते व जिल्हा नियोजन मंडळ सदस्य मा.राजेंद्रसिह यादव यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन कराड शहरातील विविध विकास कामांसाठी मंजुर झालेल्या निधीमधुन कराड शहरातील विविध ठिकाणच्या विकासकामांचा शुभारंभ आज मा.राजेंद्रसिह यादव यांच्या नेतृत्वाखाली धुमधडाक्यात संपन्न झाला.
कराड शहरातील शनिवार पेठ चिगळे सर्जिकल ते श्रीराम हॉस्पिटल रस्ता डांबरीकरण,डाॅ.सुहास पाटील ते यश एम्पायर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण,महाराष्र्ट ट्रान्सपोर्ट ते शिवाप्पा खांडेकर घरापर्यंत रस्ता काॅक्रिटीकरण,वाखाण भागातील मुख्य रस्त्यापासुन दक्षिणेकडे महापुरे यांच्या घरापर्यत काॅक्रिटीकरण या कामांचा शुभारंभ करण्यात आला यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव बाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्या-त्या परिसरातील ज्येष्ठ नागरीकांच्या हस्ते ही कामे सुरु करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, स्मिता हूलवान,निशांत ढेकळे,ओमकार मुळे,किरण पाटील, गजेंद्र कांबळे,विनोद भोसले,विजयसिंह यादव भाऊ सुधीर एकांडेकाका,नुरुल मुल्ला,राहुल खराडे,सचिन पाटील,शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र माने तसेच येथील स्थानिक रहिवासी उपस्थित होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री शंभूराजे देसाई यांच्या माध्यमातून व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष शिवसेना नेते मा श्री राजेंद्रसिंह यादव (बाबा) यांच्या पाठपुराव्यामुळे कराड शहरात होत असलेल्या विविध विकास कामांसाठी भरघोस निधी मंजुर करुन आणुन विकास कामांचा शुभारंभही होत आहे कराड शहरातील नागरिक यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव बाबा व यशवंत विकास आघाडीला धन्यवाद देत आहेत.
No comments:
Post a Comment