वेध माझा ऑनलाइन
सैफ अली खानवर रात्री अडीच वाजता हल्ला झाल्याचा प्रकार घडला या घटनेची माहिती समोर आली तेव्हा खासदार सुप्रिया सुळे या बारामती येथील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात होत्या. त्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने सैफच्या कुटुंबीयांना फोन केला.
सुप्रिया सुळे यांनी फोनवरील व्यक्तीला सांगितले की, बेबो आणि सैफला सांग मी फोन केला होता. काय होतंय, ते मला सांगत राहा. काळजी घ्या. मी काही मदत करु शकत असेन तर मला सांगा, असे सुप्रिया सुळे यांनी फोनवरील व्यक्तीला सांगितले. हा फोन ठेवल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी याबाबत फार बोलण्यास नकार दिला. मात्र, सैफ अली खानवरील हल्ला धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले
No comments:
Post a Comment