पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कराड येथील यशवंत हायस्कूल मतदान केंद्रावर सकाळी 10.15 च्या दरम्यान आपला मतदानाचा हक्क बजाविला.
दरम्यान कराडच्या भाजपच्या नगरसेवकांनी तसेच विविध पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी मतदान केंद्रावर सकाळपासून ठिय्या दिल्याचे दिसून आले
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमवेत आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी मतदानाचा आढावा घेत संबंधितांशी चर्चा करण्यात आली.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांसाठी प्रयत्न केले आहेत. मतदानाच्या दिवशी प्रमुख नेत्यांच्या केंद्रभेटींमुळे निवडणुकीच्या घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार अतुलबाबांनी महायुतीचे दोन्ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे
No comments:
Post a Comment