Friday, October 23, 2026

पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात सौरभ पाटील यांचा ठिय्या!सकाळी ७.३० पासून कराडमध्ये धावपळ; ग्रामीण भागातही सूक्ष्म नियोजन, महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी झोकून देऊन काम ;


वेध-माझा ऑनलाइन।
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाचा दिवस उजाडताच माजी नगरसेवक सौरभ पाटील यांनी सकाळी ७.३० वाजल्यापासून कराडमध्ये ठिय्या देत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ जोरदार धावपळ सुरू केली. केवळ उपस्थितीपुरते मर्यादित न राहता, मतदानाच्या प्रक्रियेत बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष देत त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने आपली जबाबदारी पार पाडल्याचे चित्र दिसून आले.

मतदानाच्या दिवशी प्रत्येक मत महत्त्वाचे असल्याचे लक्षात घेऊन सौरभ पाटील यांनी सकाळपासूनच सूक्ष्म नियोजनावर भर दिला. स्वतःची रिड्स गाडी पाठवून मतदारांना मतदानासाठी आणण्याची व्यवस्था केल्याचे दिसून आले. विशेषतः ग्रामीण परिसरात शिक्षक व पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची चर्चा होती. मतदानाच्या प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी त्यांनी विविध पातळ्यांवर लक्ष केंद्रित केले.

या धावपळीत एका गर्भवती महिला मतदाराला काळजीपूर्वक मतदानासाठी आपली स्वतःची गाडी पाठवून मतदानासाठी आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचीही संबंधित ठिकाणी चर्चा झाली. मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करताना त्यांच्या सोयीची काळजी घेण्यावरही त्यांनी भर दिल्याचे दिसून आले.
सकाळी ७.३० पासून सुरू झालेली त्यांची धावपळ, ग्रामीण भागातील संपर्क आणि मतदानाच्या नियोजनातील बारकावे यांमुळे कराड परिसरात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ त्यांनी सक्रिय योगदान दिले त्यामुळे आज मतदानाच्या दिवशी सकाळपासून अखेरपर्यंत सक्रिय राहून केलेल्या प्रयत्नांमुळे सौरभ पाटील यांची भूमिका कराडमधील राजकीय चर्चेचा विषय ठरली.

या संदर्भात ‘वेध माझा’शी बोलताना... 
सौरभ पाटील म्हणाले.. 
“सकाळपासूनच पदवीधर व शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेससह महाविकास आघाडीच्या सर्वच आजी- माजी नगरसेवकांसह इतर घटकांनी देखील नियोजनबद्ध प्रयत्न केले. ग्रामीण भागासह विविध ठिकाणी मतदारांशी संपर्क साधून मतदानासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यावर भर दिला. या प्रयत्नांची मतदार नक्कीच दखल घेतील आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करतील, असा मला विश्वास आहे.”

No comments:

Post a Comment