Sunday, December 31, 2023

मराठा समाजाचा डाटा गोळा करायला एक वर्षे लागेल, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले स्पष्ट ; जरांगे पाटील म्हणाले... याबाबतचा कायदा करायला एक तास पुरेसा आहे ;

वेध माझा ऑनलाइन।
मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करायला आणि डाटा गोळा करायला एक वर्षांचा काळ देखील लागू शकतो. तसेच मराठा आरक्षणाचे काम असे तारीख निश्चित ठरवून देताच येत नाही असे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. यावर आपली मागणी ओबीसीतून मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रावर आरक्षण हवे आहे. आपल्या वरच्या कोर्टातल आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वर जाणारे असल्याने नकोच असल्याचे मराठा समाज आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.दरम्यान यावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमची मागणी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रावर ओबीसीतून सरसकट आरक्षणाची आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे सिद्ध झाले आहे. 54 लाख पुरावे मिळाले आहेत. या संदर्भात कायदा पास करायला एक तास पुरेसा असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

मराठा समाजाचा डाटा गोळा करायला निदान एक वर्षांचा कालावधी तरी लागू शकतो. तसेच मराठा आरक्षणासाठी कोणतीही तारीख निश्चित धरून ते देता येणार नाही असेही कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्रातील मराठा लोकांची संख्या तीन साडे तीन कोटी आहे. त्यामुळे मराठा समाजाचा डाटा गोळा करण्यास वेळ लागू शकतो असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. तर यावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमची मागणी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रावर ओबीसीतून सरसकट आरक्षणाची आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे सिद्ध झाले आहे. 54 लाख पुरावे मिळाले आहेत. या संदर्भात कायदा पास करायला एक तास पुरेसा असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आम्ही वरचे ते कोर्टातले आरक्षण मागितले नाही. ते पन्नास टक्क्यांचे वर जाते म्हणून ते टिकणारे नाही. मागासलेपण सिद्ध करायला एक वर्षे पन्नास वर्षे देखील लागू शकतील. चंद्रकांत पाटील आहेत म्हटल्यावर नक्कीच पन्नास वर्षे लागतील अशी टीकाही जरांगे पाटील यांनी केली आहे.

Saturday, December 30, 2023

बालेकिल्यातच अजितदादांना उद्धव ठाकरेंचा धक्का ; अजितदादा समर्थकांचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश ;

वेध माझा ऑनलाइन। बालेकिल्ला असलेल्या पुण्यातच अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. अजितदादांच्या समर्थक नेत्याने शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. अजित पवार यांचे खंदे समर्थक संजोग वाघेरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मुंबईतील ‘मातोश्री’ या ठाकरे यांच्या निवासस्थानी वाघेरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. संजोग वाघेरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन हाती बांधून घेतलं. हजारो समर्थांसह वाघेरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह इतरही नेते उपस्थित आहेत.

शिवबंधन बांधल्यानंतर वाघेरे म्हणाले…
अजित पवार यांचे खंदे समर्थक संजोग वाघेरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी वाघेरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला आपण पक्षात प्रवेश दिला. त्याबद्दल मी उद्धव साहेबांचे आभार मानतो. मी शब्द देतो की, येत्या काळात मी पक्षाच्या प्रसारासाठी मी प्रयत्न करत राहील. लोकांच्या सेवेसाठी कायम उपलब्ध असतो. हे काम पुढे घेऊन जाण्याचं काम मी करेन, असं वाघेरे म्हणाले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?
उद्धव ठाकरे यांनी संजोग वाघेरे आणि त्यांच्या समर्थकांचं पक्षात स्वागत केलं. मातोश्रीत आलेल्या शिवसेनेच्या सर्व वाघांचं स्वागत करतो. वाघेरे म्हणाले, की ते मला भेटल्यावर भावून झाले. पण हा काळ असा आहे की, जे भावूक आहेत. निष्ठावंत आहेत. ते लोक भगव्यासोबत आहेत. माझ्यासोबत आहेत. जे खाऊक आहेत त्यांना खोक्यात घालायचं आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी वाघेरे यांचं स्वागत करत असतानाच शिंदे गटाला टोला लगावला आहे.

Friday, December 29, 2023

राज ठाकरेंना महायुतीत आणण्याच्या हालचाली सुरू ! भाजप च्या बड्या नेत्याचे याबाबत मोठं विधान :

वेध माझा ऑनलाइन।  आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक जोरदार तयारीला लागले आहेत. भाजपप्रणित सत्ताधारी एनडीए आघाडीला कोणत्याही अवस्थेत देशात पुन्हा सरकार आणायचं आहे. तर विरोधी पक्षांच्या स्थापन झालेल्या इंडिया आघाडीला ‘करो या मरो’ या धर्तीवर मोदी सरकारचा पराभव करायचा आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने जोरदार हालाचाली घडताना दिसत आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असणारा पक्ष आणि मराठी माणासाच्या प्रश्नांसाठी लढणारा प्रभावी नेता म्हणून ओळख असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कोणाच्या बाजूने असणार? हा मोठा प्रश्न आहे. राज ठाकरे यांनी नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. या नेत्यांमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कसं सेलिब्रेशन करावं, याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आलीय. असं असताना आता सत्ताधारी पक्षांकडून राज ठाकरे यांना आपल्यासोबत यावेत यासाठी अप्रत्यक्षपणे ऑफर देणारी वक्तव्ये सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांकडून केली जात आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांना महायुतीत आणण्याच्या जोरदारी हालचाली तर सुरु नाहीत ना, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या दोन मोठ्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. या नेत्यांनी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिलीय. मंत्री शंभूराज देसाई यांनी तर राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी आम्ही तयार असल्याचं वक्तव्य केलं आहे. “राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर उत्तमच आहे. ते आमच्यासोबत आले तर त्यांच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहू. राज ठाकरे हे मोठे नेते आहेत”, असं शंभूराज देसाई म्हणाले आहेत. शिंदे गटाचेच नेते संजय शिरसाट यांनीदेखील याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. राज ठाकरे हे वेगवेगळ्या सूचना देत असतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी मुख्यमंत्री आणि ठाकरेंच्या भेटीवर दिली आहे.

भाजपच्या बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य
विशेष म्हणजे राज्य आणि देशातील सध्या घडीतला सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपचे बडे नेते गिरीश महाजन यांनीबाबत राज ठाकरे यांच्याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. त्यांनी राज ठाकरे यांना समविचारी म्हटलं आहे. “ते येत असतील तर कुणाला हरकत नसावी. जिथे चुकत असतील तर तिथे टीका केली पाहिजे. आम्ही समविचारी आहोत. उलट ते सोबत आले तर महायुतीची ताकद वाढेल. त्यांना मानणारा मोठा वर्ग राज्यात आहे”, असं गिरीश महाजन म्हणाले आहेत.

उद्या शनिवारी कराडमध्ये भव्य श्रीराम शोभायात्रेचे आयोजन ! मोठ्या संख्येने सामील व्हा : सकल हिंदू समाजाच्या वतीने आवाहन ;

वेध माझा ऑनलाइन।
अयोध्येमध्ये दिनांक २२ जानेवारी रोजी श्रीराम जन्मभूमी वर भगवान श्रीरामलल्लांची प्रतिष्ठापना होत आहे ... या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने भारतातील प्रत्येक गावात घरोघरी जाऊन रामसेवक या पवित्र सोहळ्याचे निमंत्रण आणि मंगल अक्षता देणार आहेत...अयोध्येहून आलेल्या या मंगल अक्षता कलशाचे दर्शन कराडकर नागरिकांना व्हावे या उद्देशाने कराड मधील सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य श्रीराम शोभायात्रेचे आयोजन  दिनांक ३० जानेवारी रोजी दुपारी ३ .३० वाजता श्री शिव तीर्थ ( दत्त चौक, कराड ) येथून करण्यात आले आहे ... 

कराड मधील विविध आध्यात्मिक सेवा संस्था - भजनी मंडळे - विविध पंथ संप्रदाय, मठ मंदिरे, गणेश उत्सव आणि नवरात्र उत्सव मंडळे तसेच सर्व हिंदुत्ववादी संघटना या सर्वांनी मिळून या श्रीराम मंगल कलश दर्शन शोभायात्रेचे नियोजन केले आहे...

ही शोभा यात्रा दत्त चौक - आझाद चौक - चावडी चौक - कन्या शाळा - श्री ज्योतिबा मंदिर - डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा - महात्मा ज्योतिबा फुले पुतळा - कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा ( स्टँड परिसर ) या मार्गे येऊन शिव तीर्थावर सांगता होईल अशी माहिती आयोजकांनी दिली आहे ...

"तरी अयोध्येहून आलेल्या या मंगल कलशाचे दर्शन घेण्यासाठी आणि ऐतिहासिक कराड नगरी मधील सर्व देवी देवतांना अयोध्येमधील या मंगल सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी कराड मधील सर्व माता भगिनी आणि नागरिकांनी पारंपरिक वेशात या भव्य शोभायात्रेत सहभागी व्हावे" असे आवाहन कराड मधील सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे...

नवीन वर्षात पेट्रोल आणि डिझेल १० रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता : नरेंद्र मोदी स्वतः याविषयीची घोषणा करणार !

वेध माझा ऑनलाइन। नवीन वर्षात पेट्रोल आणि डिझेल १० रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात होती. देशात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करावे की नाही, यावर पेट्रोलियम मंत्रालय आणि अर्थ मंत्रालयामध्ये बराच काळ चर्चा सुरू होती. समजा, पेट्रोल अन् डिझेल स्वस्त केले तरी ते किती करावे? दोन्ही मंत्रालयांपैकी त्याचा भार कोण उचलणार, अशीही चर्चा सुरू होती. या संपूर्ण खर्चाचा बोजा तेल कंपन्यांवरच टाकावा का? यावरही विचारविनिमय सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते, या संपूर्ण प्रकरणावर दोन्ही मंत्रालयांमध्ये एकमत झाले आहे. पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करण्याची तयारीही सुरू झाली आहे. ज्याची घोषणा खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. 

पंतप्रधान स्वतः मोठी घोषणा करणार
नवीन वर्षात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ८ ते १० रुपयांची कपात करून मोठी घोषणा करू शकतात. देशातील महागाई कमी करणे हे सरकारचे प्राथमिक लक्ष्य बनले असल्याने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. महागाई कमी करण्यासाठी आरबीआयने आधीच व्याजदर २.५० टक्क्यांनी वाढवले ​​आहेत. तसेच अन्नधान्य महागाई कमी करण्यासाठी सरकार आधीच अनेक पावले उचलत आहे. आता फक्त पेट्रोल आणि डिझेल उरले होते, जे सरकारसाठी डोकेदुखी ठरत होते. ज्यावर काही काळ अर्थ आणि तेल मंत्रालयात चर्चा सुरू होती. दोन्ही मंत्रालयांना डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत काय आहे, याचे निरीक्षण करायचे होते. जर कच्च्या तेलाची किंमत ८० डॉलर किंवा त्याहून कमी राहिली तर जानेवारीच्या सुरुवातीला पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



सुप्रिया सुळे यांनी घेतला अजितदादांचा धसका ; काय आहे बातमी.?

वेध माझा ऑनलाईन। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवार यांनी आपला वेगळा गट तयार केला. त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवार यांना कोडींत पकडण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व लोकसभा जागांवर अजित पवार यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यात बारामती आणि शिरुर लोकसभा मतदार संघात शरद पवार गटातील उमेदवाराचा पराभव करण्यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली आहे. अजित पवार यांच्या या भूमिकेचा धसका सुप्रिया सुळे यांनी घेतला आहे. पुढील दहा महिने सुप्रिया सुळे बारामतीत तळ ठोकून रहाणार आहे. आता मतदान होईपर्यंत माझी गाडी मुंबईला जाणार नाही. माझ्या कुटुंबियांना मी म्हटले आहे की, तुम्हाला आई किंवा बायको पाहायची असेल तुम्ही बारामतीत या, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.

लोकसभा निवडणूक एप्रिल महिन्यात होणार आहे. त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुका ऑक्टोबर महिन्यांत होणार आहे. यामुळे आता या दोन्ही निवडणुकीत बारामतीवर लक्ष सुप्रिया सुळे यांनी केंद्रीत केले आहे. मी बारामती तळ ठोकून राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अजित पवार यांनी बारामतीत उमेदवार देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सुप्रिया सुळे ऍक्टिव्ह मोडवर आल्या आहेत. त्यांनी आपला मुक्काम बारामतीच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बारामतीमधून ते सर्व राजकीय सूत्र हलवणार आहे. यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबियांमध्येच सामना रंगणार आहे.

Thursday, December 28, 2023

मोदी सरकारकडून लोकसभा निवडणुकीपूर्वी मिळणार मोठं गिफ्ट : पेट्रोल-डिझेल दरात होणार मोठी कपात !

वेध माझा ऑनलाइन। मोदी सरकारकडून सर्वसामान्य लोकांना मोठे गिफ्ट मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी हे गिफ्ट देण्यात येणार आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे महागाई कमी होणार आहे. केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करणार आहे. यासंदर्भात घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेल किमतीत 6 ते 10 रुपये कपात करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकार तेल कंपन्यांशी बोलणी करत आहेत. यापूर्वी 22 मे रोजी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कपात करण्यात आली होती. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर अनेक महिन्यांपासून बदलले नाही. मागील वेळेस केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात बदल करत पेट्रोलचे दर 13 रुपये तर डिझेलच्या दरात 16 रुपये कपात केली होती.

तेल कंपन्यांशी चर्चा
पेट्रोलियम मंत्रालय आणि अर्थ मंत्रालयात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपातीसांदर्भात चर्चा सुरु आहे. तसेच पेट्रोलियम कंपन्यांशी चर्चा सुरु करण्यात आली आहे. सर्व काही सुरळीत राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 6 रुपये ते 10 रुपये कपात होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मागील काही महिन्यांपासून क्रूड आईलच्या दरात घसरण झाली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड आईलचे दर 80 डॉलर प्रती बॅरल आहे. यामुळे भारतीय तेल कंपन्यांना फायदा झाला आहे. आता हा फायदा सर्वसामान्य लोकांना देण्याची तयारी केंद्र सरकारने सुरु केली आहे.

धक्कादायक बातमी ! पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून सोने-चांदीचे दागिने गायब?

वेध माझा ऑनलाइन। काही दिवसांपूर्वी तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील पुरातन आणि मौल्यवान सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानंतर आता पंढरपूरच्या महाराष्ट्रातील जागृत अशा विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात असाच काहीसा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक अ‍ॅड. सुनील घनवट यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कारभारावर धक्कादायक आरोप केले आहेत. एसआयटी नेमून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कारभाराची चौकशी करा, अशी मागणी सुनील घनवट यांनी केली आहे. श्री विठ्ठलाचे 203 आणि रुक्मिणी मातेच्या 111 दागिन्यांची नोंद ताळेबंदामध्ये दिसून येत नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र मंदिर महासंघ आक्रमक झालं आहे.

संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी मंदिर महासंघाने केली आहे. लेखापरीक्षकांना रजिस्टर दाखवले नाही तर लेखा परीक्षण का केले? असा सवाल करण्यात आला आहे. आम्हाला 315 दागिने दिले नाहीत असं लेखापरीक्षकांचा अभिप्राय आहे. दागिने सील करून ठेवले जात नाहीत. दागिने सील न केल्याने दागिने गायब करण्याला किंवा बदलण्याला वाव मिळतो. देणगी मोजताना बाहेर सुरक्षा रक्षक नेमला नाही, असा आरोप महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी केला आहे.“शौचालय बांधण्यासाठी रेल्वेची जागा भाड्याने घेतली आणि 22 लाख 6 हजार 575 रुपये दिले. पण शौचालय बांधले नाही. सरकारने 2016 पासून नियुक्त अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करावी. समिती बरखास्त करा आणि अधिकाऱ्यांना बडतर्फ करा”, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने केली आहे.

Wednesday, December 27, 2023

संजय शहा यांची भाजपच्या केमिस्ट आघाडीच्या कराड शहर अध्यक्षपदी निवड ; शहा यांचे कराड शहरातून होतय अभिनंदन ;

वेध माझा ऑनलाइन।
कराडचे औषध व्यापारी संजय शहा यांची भाजप च्या केमिस्ट आघाडीच्या कराड शहर अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी याबाबतचे नियुक्तीपत्र श्री शहा याना दिले आहे

संजय शहा यांच्या आतापर्यंत च्या संघटनात्मक कार्याची दखल घेऊन त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात म्हटले आहे भाजप पक्षाचे काम तळागाळात पोचवण्यासाठी शहा यांचे प्रयत्न महत्वाचे ठरतील व त्यामुळे संघटन आणखी मजबूत होईल अशी अपेक्षाही भाजप च्या वतीने देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आली आहे

शहा यांनी मेडिकल असोसिएशन च्या माध्यमातून अनेक उपक्रमात आपला सहभाग नोंदवला आहे अनेक सामाजिक उपक्रमात देखील त्यांचा सहभाग हिरीरीने राहिला आहे संजय शाह यांनी केमिस्ट असोसिएशनचे तालुका व जिल्हा पदाधिकारी  म्हणून गेली 15 वर्षे यशस्वी काम पाहिलं आहे   तसेच जैन समाजामध्ये त्यांचं विविध स्तरावर सामाजिक काम चालूच असते त्यात प्रामुख्याने जैन समाज वधू वर मंडळातील त्यांचे काम सर्वपरिचित आहे
ते जैन सोशल ग्रुप कराडचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत तसेच ते अखिल भारतीय जैन समाज संघटनेचे संचालक म्हणून देखील काम पाहतात

कराडच्या मैत्री ग्रुप व आनंद ग्रुपच्या माध्यमातूनदेखील त्यांचे विविध प्रकारचे सामाजिक कार्य अखंड सुरूच असते शहा यांच्या नियुक्तीमुळे भाजप पक्षाच्या संघटन कार्याला नक्कीच बळकटी मिळेल असा भाजप पदाधिकाऱ्यांना विश्वास आहे  भाजप च्या केमिस्ट आघाडीच्या कराड शहर अध्यक्षपदी शहा यांची नियुक्ती झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

Tuesday, December 26, 2023

औषध व्यापारी प्रितेश मेहता (गल्या मेहता) यांची भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या कराड तालुका अध्यक्षपदी निवड : मेहता यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छाचा वर्षाव:

वेध माझा ऑनलाइन।
कराडचे औषध व्यापारी प्रितेश मेहता (गल्या मेहता) यांची भाजप च्या अल्पसंख्याक मोर्चाच्या कराड तालुका अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी याबाबतचे नियुक्तीचे पत्र श्री मेहता याना दिले आहे

प्रितेश मेहता यांच्या संघटनात्मक कार्याची दखल घेऊन त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात म्हटले आहे भाजप पक्षाचे काम तळागाळात पोचवण्यासाठी मेहता यांचे प्रयत्न महत्वाचे ठरतील व त्यामुळे संघटन आणखी मजबूत होईल अशी अपेक्षाही भाजप च्या वतीने देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आली आहे

प्रीतेश मेहता यांनी मेडिकल असोसिएशन च्या माध्यमातून अनेक उपक्रमात आपला सहभाग नोंदवला आहे कोरोना काळात घरपोच औषध व्यवस्था त्यांनी राबवली आहे तसेच गणेशोत्सव काळात प्रसाद वाटप करणे पूरपरिस्थिती मध्ये पूरग्रस्तांना कपडे वाटप करणे अशा अनेक सामाजिक उपक्रमात देखील त्यांचा सहभाग हिरीरीने राहिला आहे मेहता यांच्या नियुक्तीमुळे भाजप पक्षाच्या संघटन कार्याला नक्कीच बळकटी मिळेल असा भाजप पदाधिकाऱ्यांना विश्वास आहे  भाजप च्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या कराड तालुका अध्यक्षपदी मेहता यांची नियुक्ती झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्यानंतर बारामतीत आणखी एक भावी खासदार ? कोण आहेत या महिला नेत्या ?

वेध माझा ऑनलाइन। राज्यासह अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. कारण त्या ठिकाणी सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार या नदंन-भावजयांमध्ये लढतीची शक्यता आहे. अशात आता आणखी एका व्यक्तीची भावी खासदार म्हणून चर्चा सुरू झाली आहे. इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील ठाकरे यांच्या नावाचे बॅनर्स आता झळकू लागले आहेत. 

राष्ट्रवादीतील फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उमेदवार देणार असल्याचं अजित पवारांनी या आधीच जाहीर केलं आहे. त्यामुळे शरद पवारांच्या गडाला हादरा द्यायचा असेल तर तेवढाच तगडा उमेदवार दिला पाहिजे अशी वस्तुस्थिती आहे. याच कारणामुळे बारामतीमध्ये स्वतः अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या खासदारकी लढवणार अशी चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार या अनेक सार्वजनिक कार्यक्रमात दिसत असल्याने त्या राजकारणात सक्रिय झाल्याची चर्चा आहे. 

अंकिता पाटील यांचेही फ्लेक्स झळकले
एकीकडे नणंद-भावजय अशा लढतीची शक्यता वर्तवली जात आहे, तर आता दुसरीकडे इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटील यांची भावी खासदार अशा आशयाचे फ्लेक्स झळकल्याचं दिसून येतंय. अंकिता पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे फ्लेक्स झळकले जात आहेत. अंकिता पाटलांच्या 'भावी खासदार' या फ्लेक्समुळे त्या लोकसभेची निवडणूक लढवणार का अशी चर्चा सुरू आहे. 
अंकिता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे. अंकिता पाटील या भाजपच्या युवा मोर्चाच्या पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षा आहेत. इंदापुरातील कॉलेजसमोर अंकिता पाटील यांचे भावी खासदार असा उल्लेख केलेला फ्लेक्स लावला आहे. हा फ्लेक्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
पवार कुटुंबीयांचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामतीमध्ये सुप्रिया सुळे या तिसऱ्यांदा खासदार झाल्या आहेत. त्या आधी या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे निवडणूक लढवत होते. आता राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ही जागा आपला गट लढवणार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. 

राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवार सामील आहेत आणि या ठिकाणी राष्ट्रवादीचा खासदार आहे. त्यामुळे महायुतीतील ही जागा अजित पवारांनाच मिळणार हे स्पष्ट आहे. मग अंकिता पाटील लोकसभेची निवडणूक कोणत्या पक्षातून लढवणार असा प्रश्न विचारला जात आहे.

अंकिता पाटील या या आधी इंदापूरच्या राजकारणात सक्रिय होत्या. त्या जिल्हा परिषदेवर निवडून आल्या होत्या. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांच्या त्या राजकीय वारस असल्याची चर्चा आहे. आता येत्या काळात अंकिता पाटील या विधानसभा निवडणूक लढवणार की थेट लोकसभेची झेप घेणार हे येत्या काळात समजेल.

शालिनीताई पाटलांचे धक्कादायक वक्तव्य, अजित पवार ४ महिन्यांत तुरुंगात जाणार, एकनाथ शिंदेंबद्दल काय म्हणाल्या…?

वेध माझा ऑनलाइन।
तुरुंगात गेलेल्या माणसाला निवडणुकीला उभे राहता येणार नाही. पुढील ४ महिन्यांत अजित पवार तुरुंगात जातील. त्यामुळे ते मुख्यमंत्री होण्याची अजिबात शक्यता नाही. अजित पवार तुरुंगात गेल्यावर तिथे त्यांना भेटायलाही कोणी जाणार नाही, असे धक्कादायक वक्तव्य शालिनीताई पाटील यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना केले. शालिनीताई पाटील या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आहेत.

शालिनीताई पाटील म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस  पुढील मुख्यमंत्री होतील. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसतील. कारण, शिंदे पक्ष फोडून बाहेर पडले आहेत. ते शिवसेनेच्या  बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने निवडून आले आहेत. ते सत्तेसाठी तिकडे गेले आहेत. त्यांना सरकार चालवता येत नाही.
शालिनीताई पाटील पुढे म्हणाल्या, राज्यात याचे बंड, त्याचे बंड, ग्रामसेवकांचे प्रश्न, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाने झालेले शेतकऱ्यांचे नुकसान, मराठवाड्यातला दुष्काळ, कांदा आणि ऊसाचा प्रश्न, अशा कुठल्याही प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे यांना तोडगा काढता आलेला नाही.
शालिनीताई पाटील म्हणाल्या, यंदा महाराष्ट्रात कांद्याचे गरजेपेक्षा जास्त उत्पादन झाले.
हा कांदा निर्यात करायला हवा. परंतु, केंद्राने निर्यातबंदी लागू केली आहे.ही निर्यातबंदी उठवण्याबाबत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी १० वेळा शब्द दिला.ते दिल्लीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटायला गेले.पण शाहांनी त्यांची भेट घेतली नाही.

अजित पवारांच्या भेटीसाठी नवाब मलिक 'देवगिरी'वर दाखल ; राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकी दरम्यान झाले दाखल...राज्यभर चर्चांना उधाण ;

वेध माझा ऑनलाइन। राज्याचे उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे देवगिरी बंगल्यावर दाखल झाले आहेत. अजित पवारांचे शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची बैठक सुरू होती. त्याच दरम्यान मलिकदेखील दाखल झाले. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि इतर पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीदरम्यान मलिक हे देवगिरीवर दाखल झाल्याने पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. 

विधीमंडळ अधिवेशनात सत्ताधारी बाकांवर
नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या विधीमंडळ हिवाळी अधिवेशनात मलिक यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी ते सत्ताधारी बाकांवर बसले. त्यामुळे त्यांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवारांना साथ दिली असल्याची चर्चा सुरू झाली होती. तर, दुसरीकडे मलिक हे सत्ताधारी बाकांवर आल्याने विरोधी पक्षांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर टीकास्त्र सोडले होते. मलिक यांना अटक झाली तेव्हा भाजपने त्याचे कृत्य देशद्रोही असल्याचे म्हणत त्यांच्या अटकेच्या कारवाईचे समर्थन केले होते. तर, शिवसेनेत फूट पाडल्यानंतर शिंदे गटानेदेखील उद्धव ठाकरे यांनी मलिकांबाबत घेतलेल्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. 

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर मलिक कोणाच्या बाजूने जाणार हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता. पण हिवाळी अधिवेशाच्या पहिल्याच दिवशी मलिक हे सत्ताधाऱ्यांच्या बाजूने जाऊन बसले आणि या प्रश्नांना पूर्णविराम मिळाल्याची चर्चा सुरू होती. पण त्याच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं आणि जोपर्यंत मलिकांचे आरोप हे खोटे आहेत, हे सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना महायुतीमध्ये सामील न करुन घेण्याची विनंती केली. दरम्यान या पत्रामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली होती.

RBI बरोबरच मुंबईत 11 ठिकाणी बाँब ठेवल्याची धमकी; खिलापत इंडिया नावाने केला मेल; पोलीस अलर्ट मोडवर -

वेध माझा ऑनलाइन। आरबीआयच्या कार्यालयात बाँब ठेवण्यात आल्याची धमकी आल्यानतंर एकच खळबळ उडाली. ईमेलवरून बॉम्ब ठेवल्याची देण्यात आली धमकी. आरबीआय कार्यालय, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेत बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा ई मेल आला. त्यामध्ये आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. खिलाफत इंडिया या ई-मेलवरून धमकी आल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईत एकूण 11 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा एक मेल मंगळवारी दुपारी आला. दुपारी दीड वाजता हे बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याचं त्यात म्हटलं होतं. पोलिसांनी या सर्व ठिकाणी शोधमोहीम केली असता काहीही आक्षेपार्ह आढळून आल नाही. त्यानंतर एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरबीआयच्या ऑफिशिअल मेलवर बाँब ठेवल्याची धमकी देणारा मेल आल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर आरबीआयने पोलिसांनी याची माहिती दिली. मुंबई पोलिसांनी त्यांच्या बाँब स्कॉडच्या मदतीने शोध सुरू केला. पण त्यामध्ये काहीही आढळलं नसल्याचं समोर आलं. पण हा मेल कुठून करण्यात आला आणि का करण्यात आला याचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे. 

या मेलमध्ये अनेक गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जगातला सर्वात मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांनी भारतीय बँकांना लुटल्याचंही म्हटलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्ही आमचं पाऊल उचलू अशी धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये अशा प्रकारचे धमकीचे मेल आणि फोन अनेकदा येतात. पण आरबीआयच्या संदर्भात मेल आल्याने पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला आहे.
मुंबई पोलिसांना यावर्षी अनेक अधिक खोटी माहिती देणारे अथवा धमकीचे कॉल आले आहेत. यापूर्वी 15 ऑक्टोबर रोजी एका व्यक्तीने ताज हॉटेल बाँबने उडवून देण्याची धमकी दिली होती. त्यानंतर 31 ऑगस्ट रोजी मंत्रालय उडवून देण्याची धमकी देणारा फोन आला होता. यानंतर, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी शोधमोहीम राबवली असता, धमकीचा फोन अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी बाळकृष्ण भाऊसाहेब ढाकणे नावाच्या व्यक्तीने केल्याचं आढळून आलं.

वऱ्हाडींसाठी जेवायला मटणाची नळी ठरली, मात्र पंक्तीत नळी दिसलीच नाही, म्हणून मुलाने लग्नच मोडलं!


वेध माझा ऑनलाइन। जेवणाच्या पंक्तीमध्ये मटणाची नळी नसल्यामुळे तेलंगणामध्ये मुलाने चक्क लग्न मोडल्याची घटना घडली. मुलगी निजामाबादमधील राहणारी आहे तर मुलगा जगतियाल येथील राहणारा आहे. नोव्हेंबरमध्ये मुलाची घरी साखरपुडा झाला.. पण काही दिवसानंतर लग्नाच्या पंक्तीत मटणाची नळी नसल्यामुळे लग्न मोडलं गेलं. हे सर्व प्रकरण पोलिस स्टेशनमध्ये पोहचलं. पोलिसांनी वर पक्षाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही.

वधूच्या कुटुंबियांनी साखरपुड्यावेळी वर पक्षाच्या लोकांसाठी आणि उपस्थित सर्व पाहुण्यांसाठी मांसाहारी जेवणाची व्यवस्था केली. साखरपुड्यानंतर वर पक्षातील लोकांनी मटणाची नळी पंक्तीला नव्हती, असं म्हटलं. त्यानंतर वधू आणि वर पक्षाचं जोरदार भांडण झालं. त्यातच वधूकडील मंडळींनी पंक्तीला मटणाची नळी नव्हतीच, असे सांगितलं. त्यानंतर वाद आणखी वाढला. वधू आणि वर मंडळींचा वाद इतका वाढला की पोलिसांना बोलवावं लागलं. पण पोलिसांची मध्यस्थीही कामाला आली नाही, लग्न मोडलंच...
 
स्थानिक पोलिस स्टेशन अधिकाऱ्याने, वर पक्षातील लोकांना वाद थांबवण्याचा सल्ला दिला, पण वाद काही केल्या संपला नाही. ते म्हणाले की, ज्यावेळी सर्व बोलणी झाली तेव्हा मटणाची नळी पंक्तीत असेल, असे ठरले होते. पण ही गोष्ट मुद्दाम लपवली गेली. अखेर, मुलाकडील मंडळींनी हे लग्न मोडलं, अन् साखरपुड्याचा कार्यक्रमही अर्ध्यावर सुटला. सर्वांनी घरी जाणं पसंत केले. पोलिसांनी वराच्या घरच्यांना खूप समजावलं पण ते लग्नासाठी राजी झाले नाहीत. मटणात बोनमॅरो न दिल्याने वधूच्या पक्षाने अपमान केला, असल्याचे सांगितलं. मात्र, वधूपक्षातील लोकांचे म्हणणे आहे की, त्यांना याबाबत आधी सांगितले गेले नव्हते. त्यामुळे पंक्तीवेळी मटणात बोन मॅरो दिले नाहीत. ही बाब जेव्हा चर्चेत आली तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले कारण मटणासारख्या छोट्याशा गोष्टीवरून लग्न मोडल्याचे क्वचितच कोणी ऐकले असेल.

Monday, December 25, 2023

अमोल कोल्हेंना पाडण्यासाठी ठाकरेंचा शिलेदार अजित पवार मैदानात उतरवणार?

वेध माझा ऑनलाइन । शिरूर लोकसभा मतदारसंघ सध्या प्रचंड चर्चेत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना ओपन चॅलेंज दिलंय. त्यानंतर हा मतदारसंघ आणि आगामी लोकसभा निवडणूक याची राज्यात जोरदार चर्चा होतेय. अशातच अजित पवार मोठी खेळी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. अमोल कोल्हेंना धोबीपछाड देण्यासाठी ठाकरेंचा जुना शिलेदार अजित पवार मैदानात उतरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेचे वरिष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारी असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

अजित पवार यांचं चॅलेंज काय?
अजित पवार यांनी काल बोलताना अमोल कोल्हे यांच्यावर घणाघात केला आहे. अमोल कोल्हे यांना आगामी निवडणुकीत पाडणार असल्याचं अजित पवार म्हणाले. त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका उत्तम बजावली होती. पण शिरूरमध्ये आम्ही पर्याय देणार…. तुम्ही काळजीच करू नका. तिथे असलेला उमेदवार निवडूनच आणणार, असं अजित पवार यांनी म्हटलं.

अमोल कोल्हे यांना खुलं आव्हान दिल्यानंतर अजित पवार नेमका कोणता उमेदवार कोल्हेंच्या विरोधात देणार याची चर्चा होत होती. आता मात्र सूत्रांकडून महत्वाची माहिती मिळाली आहे. अमोल कोल्हे यांना टक्कर देण्यासाठी अजित पवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना मैदानात उतरवणार असल्याची माहिती आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात तगडी लढत झाली होती. उद्धव ठाकरे यांचे निकडवर्तीय आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते तसंच जाणते राजकारणी अशी ओळख असलेल्या आढळराव पाटील यांना राजकारणात नवख्या असणाऱ्या अमोल कोल्हे यांनी हरवलं होतं. आढळराव पाटील यांचा पराभव करत अमोल कोल्हे यांनी विजय खेचून आणला. आता जर आढळराव पाटील जर अजित पवार गटासोबत गेले. तर पुन्हा या दोघांमध्ये तगडी लढत होण्याची शक्यता आहे.

मी १०० टक्के निवडणूक लढवणार : खासदार अमोल कोल्हे यांचे अजित पवारांना प्रतिआव्हान ;

वेध माझा ऑनलाइन।  मी शिरूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे. शिरूरचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम शरद पवारांनी केले. निवडणूक एकमेकांना आव्हान देण्याची गोष्ट नाही तर प्रतिनिधित्व आणि प्रश्न मांडण्याची गोष्ट आहे. मी १०० टक्के निवडणूक लढवणार आहे. शरद पवार घेतील तो निर्णय मला मान्य असेल, असे म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना प्रतिआव्हान दिले आहे.

शिरूरमध्ये उमेदवार निवडून आणणारच, असा निर्धार अजित पवार यांनी व्यक्त करत अमोल कोल्हेंना आव्हान दिले होते. यावर अमोल कोल्हेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

अमोल कोल्हे म्हणाले, अजित पवार हे मोठे नेते आहेत. माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला ते आव्हान देतील, असे वाटत नाही. कारण, शिरूर मतदारसंघातील कामांचे अजित पवारांनी कौतुक केले आहे.

अमोल कोल्हे म्हणाले, पदयात्रा सूचण्याचा विषय नाही. कांद्याच्या निर्यातीबाबत शेतकऱ्यांमध्ये आक्रोश आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न पदयात्रेतून मांडणार आहोत. अजित पवारांनी पदयात्रेला पाठिंबा दिला पाहिजे. कांद्याची निर्यातबंदी उठवण्यासाठी अजित पवारांनी आमच्या सुरात सूर मिसळला पाहिजे.

काय म्हणाले होते अजित पवार…
खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका करताना अजित पवार म्हणाले होते की, एका खासदाराने मतदारसंघात पाच वर्षे लक्ष दिले असते, तर खूप चांगले झाले असते. त्या खासदाराला उमेदवारी देण्याचे काम मी केले. तसेच, निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे-पाटील यांनी जिवाचे रान केले आहे. मधल्या काळात सहाही विधानसभा मतदारसंघात ते फिरत नव्हते. पूर्णपणे दुर्लक्ष केले. मी एक कलावंत आहे,माझ्या चित्रपटांवर परिणाम होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर काढलेला चित्रपट चालला नाही.याचा आर्थिक गोष्टीवर परिणाम होत आहे, असे वरिष्ठांना आणि मला सांगत त्यांनी राजीनामा देण्याची तयारी केली होती.मी हे बोलणार नव्हतो. पण, निवडणुका आल्याने यांना उत्साह आला आहे. त्यामुळे कुणाला संघर्ष तर कुणाला पदयात्रा सूचत आहे.तेव्हा योग्य पद्धतीने उमेदवारी दिली होती. आम्ही जनाधार पाहून उमेदवारी देतो. निवडून आल्यानंतर कसे काम करायचे,
हा ज्याचा त्याचा अधिकार असतो. मात्र, आता शिरूरमध्ये दिलेला उमेदवार निवडून आणणारच, असे अजित पवार म्हणाले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले...यावेळी अमोल कोल्हेना पाडणार म्हणचे पाडणारच - काय आहे बातमी ?

वेध माझा ऑनलाइन। खासदार अमोल कोल्हेनी पाच वर्षे मतदार संघात लक्ष दिले नाही त्यांनी लक्ष दिले असते तर बरे झाले असते मी आणि दिलीप वळसेनी त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले आहे यावेळी राष्ट्रवादीचा दुसरा जो कोणी उमेदवार असेल त्याला निवडून आणणार म्हणजे आणणार असा विश्वास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केला म्हणजेच सध्याचे खासदार अमोल कोल्हे याना निवडणुकीत पाडणार असे त्यानी सांगितले मी बोलतो ते करतोच असेही ते म्हणाले दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये टीडीआर घोटाळा झाल्याचे अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडले. त्याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह या बोलावून त्यांच्याकडून माहिती घेतली. त्याबाबतचे अनेक कागदपत्रे विविध अधिकाऱ्यांना दाखवले. त्यामध्ये आयुक्त सिंह नाही म्हणत असले तरी शंका घेण्यासाठी जागा असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने वाकडमधील आरक्षित भूखंड खासगी विकासाला विकसित करण्यासाठी देऊन शासकीय नियमांची पायमल्ली करत यामध्ये दीड हजार कोटी रुपयांचा टीडीआर घोटाळा करण्यात आला. याबाबत हिवाळी अधिवेशनामध्ये चर्चा झाली. त्याबाबत विचारले असता अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडण्यात आला. मात्र, त्यावेळी अधिवेशानामध्ये असल्याने जास्त माहिती घेता आली नाही. त्यानंतर मी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून माहिती घेतली आहे. तसेच त्या संदर्भातील अनेक कागदपत्रे  मागवले. त्यानंतर नगरविकास सचिवांशी बोललो. तसेच अनेक अधिकाऱ्यांना ही कागदपत्रे दाखवली. त्यातील बहुतांश अधिकाऱ्यांनी सांगितले की आयुक्त नाही म्हणत असले तरी यामध्ये शंका घ्यायला जागा आहे. त्यामुळे मी मुंबईला जाऊन पुन्हा या प्रकरणाची सखोली चौकशी करणार आहे. तसेच राज्य सरकारला हा निर्णय थांबवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे याची शहानिशा केली जाईल. त्यामध्ये काही गडबड असेल तर निर्णयाला स्थगिती दिली जाईल. काही गडबड नसेल तर थांबवण्याचा प्रश्न येत नाही, असेही पवार यांनी सांगितले.

Sunday, December 24, 2023

मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण ; पुण्यातील घरी केले क्वारंटाईन ;

वेध माझा ऑनलाइन। देशभरात पुन्हा एकदा कोरोना महामारीने डोकं वर काढलं आहे. जेएन.1 (JN.1)या नव्या सब व्हेरियंटने देशभरात हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकरने सावध पवित्रा घेत काळजी घेण्याचं आव्हान केलेय. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ते सध्या पुण्यातील मॉडर्न कॉलनीमध्ये असलेल्या घरी कॉरनटाइन आहेत. घरीच त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहेत. मागील चार ते पाच दिवसांपासून धनंजय मुंडे यांना खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. सध्या ते पुण्यातील आपल्या घरी विलगीकरणात आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर घरीच औषध उपचार सुरु आहेत.

नागपूर अधिवेशन संपल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने मी तपासणी केली असता पुन्हा एकदा कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. मला सध्या फारसा त्रास नाही, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने मागील 4 दिवसांपासून क्वारंटाईन राहून योग्य उपचार घेत आहे. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही.

मराठ्यांनी मुंबईकडे कूच केली तर आरक्षण घेऊनच मागे फिरणार ; जरांगे पाटील यांचा विश्वास ;

वेध माझा ऑनलाईन। मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केलीय. त्यांनी बीड येथे इशारा सभा घेतली. या सभेतून त्यांनी थेट सरकारला इशारा दिला. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली.मराठ्यांचे पुढचं आंदोलन आता मुंबईत आझाद मैदानावर होणार आहे. २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा मनोज जरांगी यांनी केली.दरम्यान मराठ्यांनी मुंबईकडे कूच केली तर आरक्षण घेऊनच मागे फिरणार, असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी जरांगे म्हणाले की, मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावी, सरकारला खूप वेळ दिला. मुंबईत जाताना कुणी हिंसा करु नये. ३ कोटी मराठे मुंबईत येणार आहेत. जो हिंसा करेल तो आपला नाही. सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी, आमच्यावर डाव टाकू नये. आता आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही. आझाद मैदान, शिवाजी पार्क येथे आमरण उपोषण होणार आहे. फक्त मराठा समाजाला डाग लागला नाही पाहीजे, एवढी काळजी घ्यावी, मुंबईला जाण्याची जोरदार तयारी करा.

मनोज जरांगे म्हणाले, कुणी गाडी पेटवली तर त्याला आपणच पकडून द्यायचं. कुणाला जाळपोळ करु द्यायची नाही. आम्हाला मुंबईला यायची हौस नाही पण आता आमच्या लेकरांना न्याय हवा आहे. २० तारखेच्या आत आरक्षण देता आलं तर बघा. मी मेलो तरी चालेल मागे फिरणार नाही. २० जानेवारीची तयारी शांततेत करा, मराठ्यांनी मुंबईकडे कूच केली तर आरक्षण घेऊन मागे फिरणार, असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला.

मंजूर आराखड्यानुसार उड्डाणपुलाचे काम न केल्यास आंदोलन‘- 2004 साली आराखड्यात बदल करणारांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा ;सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील यांच्यासह कराडकरांची मागणी;

वेध माझा ऑनलाईन।  कोल्हापूर नाका येथे आशियाई महामार्गावर बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे मंजूर आराखद्यानुसारच काम करावे. येथील अपघात रोखण्यासाठी महामार्ग विभागाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उड्डणपुलाचे डिझाईन तयार केले आहे. एक दोन व्यावसायिकांच्या स्वार्थासाठी त्यांच्या दबावाला बळी पडून पुलाच्या मंजूर आराखडयात बदल करू नये अन्यथा विविध संघटना व कराडकर नागरिकांच्या वतीने जशास तसे आंदोलन करण्याचा इशारा ‘दक्ष कराडकर'चे प्रमोद पाटील यांनी दिला आहे.  

कोल्हापूर नाका येथील उड्डाणपुलाला ऍप्रोच रस्ते व्हावेत, अशी मागणी करीत 10 जानेवारी रोजी काही व्यावसायिक व लोकप्रतिनिधींनी उड्डाण पुलाचे काम रोखण्याचा इशारा दिला आहे. या विरोधात शहरातील विविध संघटनांनी शनिवारी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत मंजूर आराखडय़ानुसारच काम करण्याची मागणी केली आहे. यावेळी प्रमोद पाटील, विश्व इंडियन पार्टीचे जिल्हाध्यक्ष बापू लांडगे, प्रमोद तोडकर, प्रताप इंगवले, जाबीर वायकर, विनायक भोसले, महेश जाधव यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

प्रमोद पाटील म्हणाले, 2004 मध्ये पुणे-बेंगलोर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असताना काही व्यावसायिकांनी स्वत:च्या फायद्यासाठी कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपुलाच्या आराखडय़ात बदल केला. परिणामी एका लेनवर उड्डणपूल व दुसरी सामान्य लेन झाली. त्यामुळे उड्डाण पुलाच्या खाली शेकडो लहान मोठे अपघात झाले. आता येथे नवीन उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी पुणे-कोल्हापूर लेनवरील कोल्हापूर नाका येथील उड्डाणपूल व ढेबेवाडी फाटा येथील उड्डाणपूल पाडण्यात आला आहे. तर वारूंजी ते नांदलापूर दरम्यान सहापदरी उड्डणपूल बांधण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र कोल्हापूर नाका येथील काही पेट्रोलपंपधारक व हॉटेल व्यावसायिक स्वत:च्या फायद्यासाठी उड्डाणपुलाच्या आराखडय़ात बदल करून कोल्हापूर नाका येथे शहरात येणाऱ्या ऍप्रोच रस्त्याची मागणी करीत दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. वास्तविक या ठिकाणी ऍप्रोच रस्ते केल्यास पुन्हा अपघातप्रवण क्षेत्र तयार होणार आहे. त्यामुळे महामार्ग प्रशासनाने कुठल्याही परिस्थितीत उड्डाणपुलाच्या मंजूर आराखड्यात बदल करू नये, अन्यथा पुलाच्या बांधकामाला विरोध करणारांच्या विरोधात त्याच दिवशी त्याच ठिकाणी विविध संघटना व कराडकर नागरिकांच्या वतीने जशास तसे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

काँग्रेस नेत्याची आमदारकी करण्यात आली रद्द ; कोण आहे आमदार ...?

वेध माझा ऑनलाइन।  नागपूर  जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी  काँग्रेस नेते  सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे.  नागपूर पोलिसांनी विधीमंडळाला सुनील केदार यांच्या शिक्षेची माहिती दिली असून कोर्टाचे आदेश पाठवले होते. त्यानंतर विधीमंडळाने केदार यांच्या आमदारकीचा निर्णय घेण्यात आला आहे. 

2001-2002 मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने होम ट्रेड लिमिटेड, इंद्रमणी मर्चंट्स प्रायव्हेट लिमिटेड, सेंचुरी डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्विसेस आणि गिलटेज मॅनेजमेंट सर्विसेस या खाजगी कंपन्यांच्या मदतीने बँकेच्या रकमेतून सरकारी रोखे (शेयर्स) खरेदी केले होते.  मात्र, पुढे या कंपन्यांकडून कधीच बँकेला खरेदी केलेले रोख मिळाले नाही, ते बँकेच्या नावाने झाले नव्हते. धक्कादायक म्हणजे पुढे रोखे खरेदी करणाऱ्या या खाजगी कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या होत्या.  या कंपन्यांनी कधीच बँकेला सरकारी रोखही दिले नाही आणि बँकेची रक्कमही परत केली नाही असा आरोप आहे.तेव्हा फौजदारी गुन्ह्याची नोंद होऊन पुढे सीआयडी कडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला होता.  तपास पूर्ण झाल्यावर 22 नोव्हेंबर 2002 रोजी सीआयडीने कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. हा खटला तेव्हापासून विविध कारणांनी प्रलंबित होता. 

सुनील केदार रुग्णालयात
सुनील केदार यांच्यावर सध्या  शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. मायग्रेनमुळे  सुनिल केदार यांना  ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. मायग्रेनमुळे त्यांना तीव्र डोकेदुखी असल्याने ऑक्सिजनवर ठेवले  आहे.  सुनील केदार यांना काल नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 150 कोटी रुपयांच्या रोख घोटाळ्याप्रकरणी पाच वर्षांचा कारावास आणि साडेबारा लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. मायग्रेनमुळे तीव्र डोकेदुखीसह छातीत दुखत असल्याची तक्रार केली. तेव्हा काल रात्रीच डॉक्टरांनी केदार यांच्या ईसीजी, रक्ताच्या चाचण्यांसह इतरही काही चाचण्या केल्या होत्या. छातीतील इसीजीमध्ये थोडे बदल आढळून आले.

2002 मध्ये 150 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा
नागपूर जिल्हा बँक  घोटाळ्यातील खटल्याचा निकाल आज  लागला. यामध्ये काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 2002 मध्ये 150 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. तेव्हा केदार बँकेचे अध्यक्ष होते. ते या खटल्यातील मुख्य आरोपीसुद्धा आहेत. पुढे खाजगी कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने बँकेतील शेतकऱ्यांचे पैसेही बुडाले होते. केदार तसेच अन्य काही जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले.

Saturday, December 23, 2023

मराठा समाजासाठी दिलासा देणारी बातमी; क्युरेटिव्ह पिटीशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारली ; वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन। मराठा आरक्षणासंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह पिटीशन सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली असून लवकरच आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या बाबतीत हा मोठा दिलासा समजला जात आहे. 

याबाबत माहिती देताना मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटले आहे की,"क्युरेटिव्ह पिटिशनबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज भाष्य केले आहे. येत्या २४ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा क्युरेटिव्ह पिटिशन सुनावणीसाठी ठेवली आहे. याच अर्थ असा होतो की,  क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने नाकारले नसून, ते स्वीकारले आहे.त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की, लवकरात लवकर यात सुनावणी होईल आणि मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळेल," असे विनोद पाटील म्हणाले आहेत. 

दरम्यान, राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये दिलेलं आरक्षण मुंबई उच्च न्यायालयात टिकले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने २०२१ मध्ये हे आरक्षण रद्द केले होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारतर्फे क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आलेली होती. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली होती.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर इन-चेंबर ही सुनावणी पार पडली होती. त्यावेळी राज्य सरकारने सुनावणीत आपली भूमिका मांडली होती. त्यामुळे, या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय लवकरच आपला निकाल देण्याची शक्यता वर्तवली जात होती. ज्यात क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारले जाणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली असल्याचे विनोद पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्य सरकारसाठी आणि मराठा समाजासाठी हा मोठा दिलासा असल्याचे म्हटले जात आहे.

जरांगे पाटील म्हणाले...तयारीला लागा, 20 जानेवारी रोजी मुंबईत आमरण उपोषण; तुम्ही ट्रॅक्टर जप्त करू शकाल, मराठ्यांना दाबू शकणार नाही ;

वेध माझा ऑनलाइन । राज्य सरकार वेळकाढूपणा करत मराठ्यांची फसवणूक करतंय, आम्हालासुद्धा मर्यादा आहे, आम्ही तरी किती दिवस दम काढणार? मराठ्यांना विचारल्याशिवाय मी काही करणार नाही. आपण फक्त लढायचं नाही तर जिंकायचं सुद्धा आहे असं मनोज जरांगे म्हणाले. त्यामुळे अंतरवाली सराटीनंतर आता मुंबईत धडकायचं आहे असं म्हणत 20 जानेवारीपासून मुंबईत मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करण्याची मोठी घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे. 

मराठा आरक्षणालाठी लढणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी 18 जानेवारीपर्यंत नोटिस दिल्या आहेत. त्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, तुम्ही ट्रॅक्टर दाबू शकता, पण मराठ्यांना दाबू शकणार नाही. आतापर्यंत खूप झालं. आता मुंबईत 20 जानेवारी रोजी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करण्यात येईल. त्यासाठी मराठ्यांनी शांततेत मुंबईत यायचं. 
मराठा आंदोलनात जाळपोळ करू नका, जो जाळपोळ करेल तो आपला नाही असं मनोज जरांगे म्हणाले. 

त्या आमदारांना दारातसुद्धा उभा करू नका
जे आमदार आणि खासदार मराठा आंदोलनासाठी समाजाला साथ देत नाही, त्यांना यापुढे दारातही उभे करू नका असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं. मनोज जरांगे म्हणाले की, "आतापर्यंत मराठ्यांच्या जीवावर हे आमदार, खासदार झाले, पण मराठा आरक्षणाच्या विषयावर कितीजण पुढे आले. आता यापुढे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जे साथ देणार नाहीत त्या आमदारांना दारातही उभा करू नका. जो मराठा आरक्षणासाठी लढेल तो आपला."

शांततेत आंदोलन करा, ते ब्रह्मात्र आहे
सरकारने पुन्हा एकदा डाव रचला. मराठा समाजातील आंदोलकांना नोटिसा दिल्या. ट्रॅक्टर घेऊन सभेला गेला तर तो जप्त केला जाईल असं त्यात म्हटलंय. महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी आंदोलन करायचं पण शांततेत, ते ब्रह्मात्र आहे. शांततेत आंदोलन केल्यास ते थांबवायचं कुणाच्यात हिंमत नाही. 

मी मॅनेज होत नाही हा सरकारचा प्रॉब्लेम
मी यांना मॅनेज होत नाही हाच यांचा प्रॉब्लेम आहे. मी जिवंत असेपर्यंत मराठा आरक्षण मिळवून देणारच. मराठा समाज आणि माझं नातं हे माय-लेकाचं आहे. मराठा समाजाच्या पुढच्या पीढीला आरक्षण मिळवून देणार. या आधीच्या पीढीचे आयुष्य आरक्षणाविना उद्ध्वस्त झालं. आता मराठा जागा झाला आहे.


अहंकार माणसाचा शत्रू आहे, अहंकारापासून दूर रहा : लायन्स क्लब, रोटरी क्लब आणि सॅटर्डे क्लबच्या वतीने आयोजित व्याख्यानात चंद्रकांत निंबाळकर यांचे प्रतिपादन ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन। अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्यामुळे माणसाने अहंकारापासून नेहमी दूर राहिले पाहिजे. समाजाचे हित जोपासत असताना माणसाची स्वतःची प्रगती होत असते. त्यामुळे माणसाने समाजिताला व राष्ट्रहिताला प्राधान्य दिले पाहिजे, असे प्रतिपादन जीवन विद्या मिशनचे प्रसिद्ध व्याख्याते चंद्रकांत निंबाळकर यांनी केले.

कराड येथे लायन्स क्लब, रोटरी क्लब व सॅटर्डे क्लबच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी लायन्स क्लब ऑफ कराड मेनचे अध्यक्ष ला.खंडू इंगळे, रोटरी क्लब ऑफ कराडचे अध्यक्ष रो.बद्रीनाथ धस्के, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.प्रविण माने यांच्यासह जीवन विद्या मिशन फौंडेशनचे अध्यक्ष दिलीप महाजन, जीवन विद्या मिशन कराडचे अध्यक्ष दीपक कदम आदी प्रमुख उपस्थित होते. 

यावेळी कराड शहर व परिसरातील सामाजिक संघटनांच्या सर्व अध्यक्षांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते जीवन विद्या मशीनचे सद्गुरु वामनराव पै यांचे पुस्तक भेट देऊन करण्यात आला.

यावेळी बोलताना चंद्रकांत निंबाळकर म्हणाले, माणसाने जीवन जगत असताना अंधश्रद्धेला खतपाणी घालू नये. उपासतपास करून लोकांचे कल्याण होत नाही. उपाशी लोकांना मदत करणे गरजेचे आहे. आणि हीच खरी समाज सेवा आहे. सद्गुरु वामनराव पै यांनी तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असे सांगितले आहे. संतती हीच खरी माणसांची संपत्ती आहे. त्यामुळे त्या संततीला चांगल्या प्रकारे वाढले पाहिजे. तिच्यावर चांगले संस्कार करणे ही माणसांची खरी जबाबदारी आहे. समाजातील गोरगरीब लोकांना मदत व सहकार्य करण्याचे काम लायन्स, रोटरी व सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून केले जात आहे. ही अतिशय समाधानाची व आनंदाची बाब आहे, असेही चंद्रकांत निंबाळकर यांनी सांगितले.यावेळी दिलीप महाजन,ला.खंडू इंगळे, डॉ.प्रवीण माने यांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी कराड व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक बद्रीनाथ धस्के यांनी केले तर  सुत्रसंचालन प्रा.सुधीर पाटील यांनी केले  रमेश कांबळे यांनी आभार मानले.




सांगली,कोल्हापूर बरोबर आता सातारा जिल्ह्यातही कोरोनाचा झाला शिरकाव ; कोणत्या गावात सापडला कोरोनाचा रुग्ण :

वेध माझा ऑनलाईन। सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेगावमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला आहे अशी माहिती सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली आहे.त्यामुळे सांगली कोल्हापूर बरोबरच आता सातारा जिल्ह्यातही कोरोनाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झालं आहे

कोरोना news...

Friday, December 22, 2023

सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना जयंतीदिनी मान्यवरांकडून अभिवादन

वेध माझा ऑनलाइन।  कृष्णाकाठच्या सहकार, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विकासाचे प्रणेते आणि कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पा) यांच्या पवित्र स्मृतींना ९९ व्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, सौ. गौरवी भोसले, श्री. विनायक भोसले, आदित्य मोहिते यांच्यासमवेत कराड व वाळवा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणातील आप्पासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, कराडच्या माजी नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील, माजी नगरसेवक सौरभ पाटील, अतुल शिंदे, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन विजयबापू पाटील, डॉ. अशोक गुजर, शिवाजीराव थोरात, कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक जितेंद्र पाटील, श्रीरंग देसाई, अविनाश खरात, बाजीराव निकम, जे. डी. मोरे, धोंडिराम जाधव, दयानंद पाटील, बाबासो शिंदे, दत्तात्रय देसाई, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर चारुदत्त देशपांडे, मनोज पाटील, कृष्णा कृषी परिषदेचे अध्यक्ष गजेंद्र पाटील, ब्रिजराज मोहिते, माजी संचालक सुजीत मोरे, भाजपाचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, राज्य कार्यकारिणी सदस्या सौ. स्वाती पिसाळ, रामकृष्ण वेताळ, घनश्याम पेंढारकर, प्रमोद शिंदे, नितीन वास्के, उमेश शिंदे, मुकुंद चरेगावरकर, मंजिरी कुलकर्णी, पंकज पाटील, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा डॉ. सारिका गावडे, राजारामबापू पाटील दूध संघाचे संचालक संग्राम पाटील, जयवंत शुगर्सचे चेअरमन चंद्रकांत देसाई, राजारामबापू बँकेचे संचालक संग्राम पाटील, नामदेव मोहिते, राजेश पाटील - वाठारकर, जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दादा शिंगण, भगवानराव पाटील, व्ही. के. मोहिते, सौ. श्यामबाला घोडके, विलासराव पवार, वसंतराव पवार, राजेंद्र पवार, रेठरे बुद्रुकचे सरपंच हणमंत सूर्यवंशी, उपसरपंच श्री. भाग्यश्री पवार, आबा मोहिते, सुहास घोडके, माजी सरपंच सौ. सुवर्णा कापूरकर, आणेचे सरपंच किसनराव देसाई, कोरेगावचे सरपंच बाळासाहेब पाटील, जगन्नाथ मोहिते, प्रकाश माने, गणेश शेवाळे, आप्पासो कदम, संजय शेवाळे, मोहनराव जाधव, बाळासाहेब बागडी, रणजीत लाड, अजय रैनाक, जुळेवाडीचे सरपंच नितीन बाकले, धनाजी देशमुख, शुभम थोरात, सुबराव पवार, दिलीपराव चव्हाण, एम. के. कापूरकर, कृष्णाजी मोरे, समीर पाटील, प्रतापराव साळुंखे, जयरामस्वामी वडगावचे मठाधिपती विठ्ठलस्वामी महाराज, वसीम मुल्ला, उमेश शिंदे, मलकापूरचे नगरसेवक आबा सोळवंडे, माजी नगराध्यक्ष आबासाहेब गावडे, सूर्यकांत खिलारे, कृष्णा बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात, विजय जगताप, माजी संचालक तातोबा थोरात, महादेव पवार, हेमंत पाटील, अभिषेक भोसले, विनायक घेवदे, दिपक गावडे, रुपेश मुळे, किरण मुळे, सुरेश पाटील, अधिकराव पाटील, डॉ. सुशील सावंत, बबनराव घोडके, हेमंत धर्मे, राहुल पाटील, भूषण जगताप, नारायण शिंगाडे, अभिजीत कोठावळे, विश्वासराव जगताप, शशिकांत जाधव, अरविंद पाटील, विवेक पाटील, सूरज शेवाळे, सर्जेराव थोरात, शरद पवार, वसंतराव घोडके, अधिकराव निकम, हणमंतराव जाधव, प्रमोद पाटील, विक्रमसिंह मोहिते, दादासो थोरात, तानाजीराव देशमुख, हरिभाऊ पाटील, रामचंद्र कदम, विठ्ठल पाटील, सुधीर कांबळे, रमेश मोहिते, विवेक भोसले, नितीन शहा, गणेश पवार आदींसह मान्यवर उपस्थित होते.
 

सांगलीत नवरा, बायकोला कोरोनाची लागण; यंत्रणा अलर्ट ;

वेध माझा ऑनलाइन। सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रूग्ण आढळले असून, शहरातील विश्रामबाग परिसरात दोघांना कोरोनाचे निदान झाले आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरीयंटबाबत चर्चा सुरू असतानाच सांगलीतही रूग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. शहरातील पती-पत्नीचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर १४ जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने बैठक घेत उपचाराबाबत नियोजन केले आहे.

देशात कोरोनाचे रूग्ण आढळत असल्याने चिंता व्यक्त केली हाेती. राज्यातीलही काही भागात कोरोना रूग्ण आढळत होते. त्यानुसार महापालिका क्षेत्रात गुरूवारपासून चाचणी सुरू करण्यात आली. यात दोघे कोरोनाबाधित आढळले. सर्दी, ताप असल्याने त्यांची चाचणी घेण्यात आली. त्यांची प्रकृती चांगली आहे. रूग्णाच्या पत्नीची चाचणीही पॉझिटिव्ह आली असलीतरी कोणतीही लक्षणे नाहीत. दोन महिन्यांपूर्वी महापालिका क्षेत्रात कोरोना रूग्ण आढळला होता.

सांगलीत आढळलेल्या दोन रूग्णांना कोणत्या व्हेरीयंटचा कोरोना आहे याच्या तपासणीसाठी त्यांचे नमुने पुण्याला पाठविण्यात येणार आहेत.
दरम्यान, गुरूवारी जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. दुपारी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या ऑनलाईन बैठकीतही याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी दिली आहे."

नरबळी कायद्याची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करा - पृथ्वीराज चव्हाण

वेध माझा ऑनलाईन। माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी नरबळी बाबत राज्यातील घडलेल्या घटनांबाबत "औचित्याचा मुद्दा" माध्यमातून विधानसभेत प्रश्न विचारीत सरकारला सूचना केल्या कि, राज्यात नरबळी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या कायद्याचे नियम तात्काळ करावेत. 

६ डिसेंबर 2023 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हुंडापुरी गावात एका तांत्रिकाचा त्याच्या पत्नीचा व त्याच्या दहा वर्षाच्या नातीचा असा ट्रिपल खून अंधश्रद्धेतून करण्यात आला. संबंधित मांत्रिक हा साठ वर्षीय तांत्रिक होता तो वेगळ्या प्रकारची औषधे लोकांना देत होता, पण त्यामधून लोकांना कोणताही फायदा न होता त्याचा त्रास होत असल्याने गावातील लोकांनी त्या मांत्रिकाचा त्याच्या बायकोचा व त्याच्या नातीचा निर्घृण खून केला. अशी माहिती विधानसभेत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी देऊन एका अत्यंत महत्वाच्या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. 

तसेच पुढे त्याचप्रकारची राज्यातील काही घटनांची माहिती देताना आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, मालेगाव मध्ये जुलै 2023 मध्ये गुप्तधनाकरिता कृष्णा अनिल सोनवणे याने ८ वर्षाच्या मुलाचा गळा चिरून खून केला होता, तसेच 2019 मध्ये मंगळवेढ्यातील प्रतीक विश्वेश्वर या 9 वर्षाच्या मुलाचा नरबळी दिला होता. माझ्या तालुक्यातील एका गावामध्ये बारावीच्या मुलीचा खून झालेला होता तो एका तांत्रिकाच्या सांगण्यावरून आई-वडिलांनी केला असे सांगण्यात येते. अजूनही ते प्रकरण मिटलेले नाही. 

राज्यात २०१४ पूर्वी आघाडी सरकार असताना महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबतचा कायदा 2013 साली पारित करण्यात आलेला होता, काही दिवसापूर्वी घडलेली गडचिरोली येथील घटना असेल, मालेगावची अथवा सोलापूरची घटना असेल यावरून हेच लक्षात येते कि, जरी 2013 साली नरबळी कायदा पारित केला असला तरी या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही कारण या कायद्याचे नियम केले गेले नाहीत. त्यामुळे या कायद्याची नक्की अंमलबजावणी कशी करावी हे अजून समजत नाही. 2021 चे आकडे आहेत की दर महिन्याला एक नरबळी महाराष्ट्रात जातो. बारा महिन्यात 13 नरबळी झाले असल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन यांच्या माहितीच्या आधारे समजते. प्राध्यापक श्याम मानव याबाबतीत खूप चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे ज्याने नरबळी विरोधात कायदा केलेला आहे. यानंतर कर्नाटक व केरळ या राज्याने कायदे केले, पण त्यांनी आपल्या राज्यात नियम केलेले आहेत. अजूनही महाराष्ट्रात या कायद्याचे नियम न केल्याने या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी  होत नाही. म्हणून या अत्यंत महत्वाच्या घटनेकडे औचित्याचा मुद्दा च्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की, ताबडतोब या नरबळी कायदा संदर्भात नियम करावेत तसेच या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि या कायद्यानुसार  वर्षातील आकडेवारी प्रकाशित करावी म्हणजे या कायद्याचा किती वापर आपल्या राज्यात होतोय हे आपल्याला समजेल.

भावाला किडनी देण्याआधी 40 लाख रुपये घे...बायकोने ऐकली नाही, म्हणून मग नवऱ्याने दिला फोनवरुनच तलाक : धक्कादायक बातमी...

वेध माझा ऑनलाइन।  नवऱ्याचा दबाव झुगारुन एका 40 वर्षीय महिलेने तिच्या भावाला किडनी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे खवळलेल्या नवऱ्याने सौदी अरेबियातूनच Whatsapp वरुन महिलेला ट्रिपल तलाक दिला. किडनी देण्याआधी भावाकडून 40 लाख रुपये घे, अस पती या महिलेला सांगत होता. त्यासाठी तिच्यावर दबाव आणत होता. पण ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये ही महिला राहते. एकही पैसा न घेता तिने भावाला किडनी दिली. म्हणून पतीने तिला ट्रिपल तलाक दिला.

नवरा अब्दुल राशीद (44) विरोधात तरनुम्मने FIR नोंदवलाय. हुंडाविरोधी तसच मुस्लिम महिला कायदा 2019 अंतर्गत अब्दुल विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. सर्कल अधिकारी शिल्पा वर्मा यांनी ही माहिती दिलीय. कायद्याने ट्रिपल तलाकला भारतात बेकायदा आणि असंवैधानिक ठरवण्यात आलय. चारवर्षापूर्वी यासंबंधी कायदा मंजूर करण्यात आला. यात तीन वर्ष तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.

तरन्नुमचा भाऊ मोहम्मद शाकीरची किडनी फेल झाली. मुंबईत त्याच्यावर उपचार सुरु आहेत. भावाच आयुष्य वाचवण्यासाठी तिने किडनी देण्याचा निर्णय घेतला. किडनीच्या मोबदल्यात भावाकडून 40 लाख रुपये घे, म्हणून अब्दुल राशीद तरन्नुमवर दबाव टाकत होता. ‘मी नकार दिल्यानंतर त्याने ट्रिपल तलाक दिला’ असं तरन्नुमने सांगितलं.


कोल्हापूर शहरात कोविड 19 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ; महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क ;

वेध माझा ऑनलाइन। कोल्हापूर शहरात कोविड 19 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. रुग्ण सापडल्यानंतर महापालिकेची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी बाहेर पडताना मास्क वापरण्याचं महापालिकेचे नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी जाण टाळावं तसेच पन्नास वर्षावरील नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं महापालिकेच्या आरोग्य विभागानं आवाहन केलं आहे.
 दरम्यान, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित रुग्ण हा काल (20 डिसेंबर) कोल्हापूर शहरात दाखल झाला होता. त्याने कोठून कुठवर प्रवास केला याबाबत माहिती मिळालेली नाही. दोन दिवसांपूर्वीच सिंधुदुर्गमध्येही कोरोना रुग्ण आढळून आला होता.


Thursday, December 21, 2023

मंत्री चंद्रकांत पाटीलांनी विचारले, तू पत्रकार आहेस का?, आणि एकच गोधळ उडाला... पुण्यातून काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन। पुणे येथे चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद सुरु असताना गुरुवारी गोंधळ उडला. वन विभागाच्या परीक्षांची तयारी करणार एक तरुण चंद्रकांत पाटील यांच्या पत्रकार परिषदेत घुसला. त्याने उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला.
अनोळखी व्यक्तीने प्रश्न विचारल्यानंतर चंद्रकांत पाटील गडबडले. त्यांनी तू कोण ? तू पत्रकार आहे का ? असे विचारले. त्याने नकार देताच त्याला बाजूला नेण्याच्या सूचना चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना केल्या. यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला.

पुणे शहरात स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर पुस्तक महोत्सव सुरु आहे. त्या ठिकाणी मंत्री चंद्रकांत पाटील आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांना प्रश्न विचारला. परंतु तो पत्रकार नसल्याचे लक्षात आले. मग त्याला बाजूला घ्या, असे चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना सांगितले.
चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारणारा तरुणाचे नाव कृणाल आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून वनविभागाच्या परीक्षेसाठी तयारी करत होता. अनेकदा प्रयत्न करत असताना त्याला नोकरी लागली नाही. त्यामुळे यासंदर्भात प्रश्न त्याने विचारला होता. परंतु तो पत्रकार नव्हता तर सामान्य व्यक्ती होता. त्यामुळे त्याला बाजूला करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी त्याची प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर त्याला सोडून दिले.
मागील महिन्यात एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत पुणे शहरात गोंधळ उडला होता. त्यांच्या पत्रकार परिषदेत शाईफेक झाली होती. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून काळी पावडर फेकण्याचा प्रयत्न नोव्हेंबर महिन्यात झाला होता. तसेच ते पत्रकार परिषद घेत असताना जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. सदावर्ते यांची पत्रकार परिषद सुरु असताना एका व्यक्तिने त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यावेळी मागे उभ्या असलेल्या दुसऱ्या व्यक्तीने शाई काढून सदावर्ते यांच्यावर फेकली होती.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांना अयोध्येतील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण ; हे नेते अयोध्येला जाणार का? सोहळ्यास उपस्थित राहणार का?

वेध माझा ऑनलाइन। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांना अयोध्येतील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले आहे. हा कार्यक्रम २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख म्हणून असतील. ते प्राण-प्रतिष्ठेची पूजा करतील. खरगे आणि सोनिया गांधी यांच्याशिवाय लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनाही श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वतीने निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, या कार्यक्रमात काँग्रेसचे नेते सहभागी होणार की नाही, याबाबत निर्णय झालेला नाही. 

मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि चौधरी यांना वैयक्तिकरित्या निमंत्रण पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या सोहळ्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एचडी देवेगौडा यांनाही निमंत्रण मिळाले आहे. ट्रस्टशी संबंधित लोकांच्या शिष्टमंडळाने निमंत्रण दिले आहे. येत्या काही दिवसांत विरोधी पक्षातील अन्य नेत्यांनाही निमंत्रणे पाठवली जाण्याची शक्यता आहे. 

ट्रस्टने म्हटले आहे की, विविध परंपरेतील पूज्य संत तसेच प्रत्येक क्षेत्रात देशाच्या सन्मानासाठी योगदान देणाऱ्या सर्व प्रमुख व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले आहे. नवीन तीर्थक्षेत्रपुरममध्ये एक तंबू शहर उभारण्यात आले आहे ज्यात सहा कूपनलिका, सहा स्वयंपाकघर आणि दहा खाटांचे रुग्णालय आहे. या रुग्णालयात देशभरातील सुमारे १५० डॉक्टरांनी रोटेशन पद्धतीने सेवा देण्याचे मान्य केले आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी विविध पंथातील सुमारे चार हजार संतांना आमंत्रित करण्यात आल्याचे ट्रस्टने म्हटले आहे

Wednesday, December 20, 2023

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकारने तात्काळ घ्याव्यात - पृथ्वीराज चव्हाण


वेध माझा ऑनलाईन । राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका गेली २ वर्षाहून अधिक वर्षे प्रलंबित आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी प्रशासकच्या माध्यमातून कारभार सुरु आहे. त्यामुळे जिथे प्रशासक आहेत अशा ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या अभावी लोकांचे प्रश्न मार्गी लागण्यात अडथळे येत असल्याचे दिसून येते यामुळे सरकारने तात्काळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घ्याव्यात अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली.  

तसेच पुढे बोलताना आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, पंधराव्या वित्त आयोगाच्या नियमाप्रमाणे 2021 ते 2025 पर्यंत या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्राला एकूण 22 हजार 713 कोटी निधी हा फक्त ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणार आहे. परंतु केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे की ज्या ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका झाल्या नाहीत व जिथे प्रशासक आहेत त्या ठिकाणी केंद्राचा हा निधी मिळणार नाही. त्याप्रमाणे राज्याच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने सुद्धा शासन आदेश काढलेला आहे. 

आपल्या राज्यामध्ये जवळजवळ दोन वर्ष ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे हा जवळपास आठ हजार कोटी रुपयांचा हक्काचा निधी ग्रामीण भागातील जनतेला मिळणार नाही. त्यामुळे शासनाला माझी विनंती आहे कि, हा निधी तरी मिळाला पाहिजेच पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे निवडणुका झाल्या पाहिजेत. निवडणुकांसाठी जे राजकीय आरक्षण आहे जे आपण एससी एसटी ओबीसी यांना देतो ते सुद्धा मिळालेले नाही, त्यावर तोडगा काढून ताबडतोब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत व हा निधी केंद्र शासनाकडून आपल्याला मिळण्याबाबत प्रयत्न केले पाहिजेत. जोपर्यंत या निवडणुका होत नाहीत तोपर्यंत केंद्र सरकारसोबत आपण संपर्क साधावा आणि जो राज्याचा हक्काचा निधी आहे तो घेण्यात यावा व ज्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये लोकप्रतिनिधी नसतील तिथे येणारा निधी आमदारांच्या माध्यमातून वितरित व्हावा.

आम्हाला आरक्षण दिले नाही तर निवडणुका होणार नाहीत ; जरांगे पाटलांचा इशारा...

वेध माझा ऑनलाइन। फेब्रुवारीच्या अधिवेशनात क्युरिटीपिटेशनवरील आरक्षणाबाबत चर्चा होणार आहे. परंतु, ती आमची मागणी नाही. आमच्या मागणीनुसारचे आरक्षण २४ डिसेंबरच्या आतच मिळणार आहे. आम्हाला आरक्षण दिले नाही तर निवडणुका होत नसतात, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

जरांगे पाटील यांनी बुधवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. फेब्रुवारीत विशेष अधिवेशन होणार असले तरी आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, ते विशेष अधिवेशन क्युरिटीपिटीशबाबतच्या आरक्षणासाठी आहे आणि ते मिळाले तरी एनटी, व्हीजेएनटीसारखे टिकेल की नाही हा प्रश्न आहे. दोन महिने घ्यायचे आणि नंतर पुन्हा आरक्षणासाठी लढायचे, असे आता आम्हाला करायचे नाही. त्यामुळे आमच्या मागणीनुसार आम्हाला २४ डिसेंबर पर्यंत आरक्षण द्यावे. आरक्षण दिले नाही तर निवडणुका होत नसतात, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. शासनाने आरक्षण देण्याचे कबुल केले आहे. देणार कसे ते स्पष्ट करावे आणि राहिलेले दोन शब्द घेणे आवश्यक आहेत. आपण ते सरकारच्या कानावर घातले आहेत.
आरक्षण लढ्यातील पाचव्या टप्प्यातील दौरा आजपासून सुरू होत आहे. शांततेचे आवाहन करण्यासाठी, समाजाला आरक्षण मिळण्यासाठी हा लढा सुरू आहे. २३ तारखेला बीडमध्ये होणाऱ्या सभेत घराघरातील मराठा एकत्र येणार आहे. सरकारने आमच्यावर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आणू नये, असेही जरांगे पाटील म्हणाले

Tuesday, December 19, 2023

सुषमा अंधारेंनी आठ दिवसात दिलगिरीचे पत्र द्यावे, अन्यथा हक्कभंगास परवानगी ; नीलम गोऱ्हेंचा निर्वाणीचा इशारा ; नेमकं प्रकरण काय ?

वेध माझा ऑनलाइन। उपसभापती रविंद्र धंगेकरांना  सभागृहात बोलू देत नाहीत अशा आशयाचा व्हिडीओ शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे  यांनी प्रसिद्ध केला होता. मुळात धंगेकर या सभागृहाचे सदस्य नाहीत त्यामुळं तात्काळ सुषमा अंधारे यांच्यवर हक्कभंग आणावा, अशी मागणी सत्ताधारी पक्षाने केले आहे. त्यानंतर सुषमा अंधारे यांना आठ दिवसात दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले आहे. दिलगिरीचे पत्र न आल्यास प्रविण दरेकरांना मी हक्कभंग मांडण्यास परवानगी देईल, असे नीलम गोऱ्हे म्हणाले. 

रविंद्र धंगेकर हे विधानसभेचे सदस्य आहेत तर मग विधानपरिषदेच्या उपसभापती  नीलम गोऱ्हे त्यांना बोलू कशा देत नाहीत? असा आक्षेपाचा मुद्दा उपस्थित झाला. त्यानंतर सुषमा अंधारेच्या मुद्द्यावर विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले. नीलम गोऱ्हे म्हणाल्या,  धंगेकर इकडे सदस्य नसताना मी कसे बोलू दिले नाही. याचे कोडे उलगडलेले नाही. अज्ञानी लोकांकडून चूक झाल्यास मी समजू शकते पण जे स्वत:ला ज्ञानी समजतात अशावेळी त्यांच्या अज्ञानाबद्दल साधी दिलगिरी व्यक्त करण्याचे तरी सौजन्य असू नये. त्या व्यक्तीला जाणीव करून दिली पाहिजे. सुषमा अंधारेंनी दिलगिरी व्यक्त करायला हवी. आठ दिवसांत दिलगिरीचे पत्र न आल्यास प्रविण दरेकरांना मी हक्कभंग मांडण्यास परवानगी देईन.  

नेमकं प्रकरण काय?
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विधानसभेचे आमदार रविंद्र धंगेकर यांना बोलण्याची संधी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली नसल्याचा आरोप करत व्हिडिओ व्हायरल केला होता. दरम्यान यावरूनच भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी आक्रमक भूमिका घेत धंगेकर विधान परिषदेचे सदस्य नसतांना त्यांना बोलू न देण्याचा विषयच येत नसल्याचे मत मांडले. तसेच, माहिती न घेता आरोप करणे चुकीचे असून, सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंग आणण्याचा प्रस्ताव दरेकर यांनी विधान परिषदेत मांडला. विशेष म्हणजे यावर अनेक आमदारांनी देखील आपली भूमिका सभागृहात मांडली. 


उदयनराजेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट ; मराठा समाजाला आरक्षण देण्याची केली मागणी ;

वेध माझा ऑनलाइन।  आरक्षणाच्या प्रश्नावर नवी दिल्लीत महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांची महत्वपूर्ण बैठक झाली. बैठकीनंतर भाजपाचे राज्यसभा खा. उदयनराजे भोसले आणि माढाचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. तसेच धनगर समाजाच्या मागणीनुसार त्यांचे आरक्षण बदलून देण्याची मागणी दोघांनी केली आहे.

मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाच्या
 संदर्भाने खासदार उदयनराजे आणि निंबाळकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट मागितली होती. त्यानुसार मोदींनी दोघांना भेटीची वेळ दिली. खा. उदयनराजे आणि खा. निंबाळकरांनी मोदींसमोर मराठा आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. या दोन्ही प्रश्नांवर लवकरच सकारात्मक तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली.
पंतप्रधान मोदींसमोर भोसले-निंबाळकर या दोन्ही खासदारांनी मराठा समाजाची कैफियत मांडली. मराठा समाजाने देशासाठी बलिदान दिले आहे. मराठा समाज हा सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारा समाज आहे. परंतु, या समाजाची आर्थिक स्थिती हालाखीची आहे. शिक्षणाची फी भरणे देखील मुलामुलींना अवघड झाले आहे. शिक्षणानंतर नोकरीचीही श्वाश्वती नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी विनंती दोन्ही खासदारांनी केली.
अनुसूचित जातीमधून आरक्षण देण्याची मागणी
धनगर समाज अनेक वर्षे अनुसूचित जातीमधून आरक्षण मिळावे,यासाठी झटत आहे. इतर राज्यात धनगर समाजाला अनुसूचित जातीमधून आरक्षण मिळाले आहे. मात्र, महाराष्ट्रात ‘धनगड’ शब्द नसल्याने आरक्षण मिळत नाही. आपण यामध्ये लक्ष घालून धनगर समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी खासदार उदयनराजे आणि निंबाळकरांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे.
दिल्लीत छत्रपतींचे राष्ट्रीय स्मारक उभारावे
छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र आणि कार्य संपूर्ण जगासमोर नेण्यासाठी नवी दिल्लीत ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक’ उभे करावे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली असता केंद्र सरकार सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले. साताऱ्यातील लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर योजनेच्या जलपूजनाला येण्याचे निमंत्रणही उदयनराजेंनी मोदींना दिले.


Monday, December 18, 2023

मुंढे प्रकल्पग्रस्तांनी डॉ. अतुल भोसलेंच्या पुढाकारातून नागपुरात घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट : प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस सकारात्मक

वेध माझा ऑनलाइन। कराड दक्षिणमधील मुंढे येथील महापारेषण प्रकल्पात बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या पुढाकारातून नागपूर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री ना. फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. 

मुंढे येथील महापारेषणच्या प्रकल्पात बाधित झालेल्या ३५ जणांना २०१६ साली नोकरीत घेण्यात आले. पण प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरीस लागलेल्या या प्रकल्पग्रस्तांना गेली ७ वर्षे नोकरीत कायम करण्यात आलेले नाही. याप्रश्नी डॉ. अतुल भोसले यांनी पुढाकार घेऊन, शासनस्तरावर पाठपुरावा करावा, अशी आग्रही मागणी या प्रकल्पग्रस्तांनी काही दिवसांपूर्वी कराड येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीवेळी केली होती. त्यावेळी या प्रश्नाबाबत लवकरच उपमुख्यमंत्र्यांबरोबर प्रकल्पग्रस्तांची भेट घडवून आणण्याचे अभिवचन डॉ. भोसले यांनी दिले होते. 

त्यानुसार नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. अतुल भोसले यांच्या पुढाकारातून प्रकल्पग्रस्तांनी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली. या प्रकल्पात बाधित झालेल्या कुटुंबातील जे युवक नोकरीत आहेत, त्यांना कायम करावे यासह अन्य मागण्यांचे निवेदन ना. फडणवीस यांना देण्यात आले. 

यावेळी त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शविली. तसेच याप्रश्नी २० डिसेंबरनंतर मुंबईत प्रकल्पग्रस्तांची संबंधित विभागातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेवून हा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली. यावेळी मुंढे गावचे उपसरपंच सागर पाटील, राहुल साळवी, राहुल जमाले, दत्ता माळी, अविनाश साळवी, प्रशांत सावंत उपस्थित होते.


वेध माझा ऑनलाइन। 
दाऊद इब्राहिम… भारताचा सर्वात मोठा दुश्मन… दाऊदवर विषप्रयोग केल्याची जगभर चर्चा सुरु आहे. त्यांची प्रकृती खालावली असल्याचीही माहिती आहे. भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर हल्ला करणारा, बॉम्बस्फोट घडवून निरापराध लोकांचे प्राण घेणारा दाऊद इब्राहिम नेमका कोण आहे? दाऊदचा जन्म कुठे झाला? एका पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा अंडरवर्ल्ड डॉन कसा झाला? त्याची लाईफस्टोरी काय आहे? त्याची लाईफस्टाईल कशी आहे? विष प्रयोगानंतर या  सगळ्या प्रश्नांची उत्तरं अन् अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा डोंगरी ते दुबई प्रवास, वाचा…

जन्म रत्नागिरीतील
दाऊद इब्राहिम कासकरचा जन्म महाराष्ट्रातील रत्नागिरीत 1955 साली झाला. दाऊदचे वडील इब्राहिम कासकर हे पोलीस कॉन्स्टेबल होते. नंतर कासकर कुटुंब मुंबईतील डोंगरी भागात स्थायिक झालं. 70 च्या दशकात अंडरवर्ल्डच्या जगात दाऊदचं नाव मोठं होऊ लागलं.  दाऊदचा भाऊ साबीर इब्राहिम कासकर याची 1981 ला हत्या झाली. त्यानंतर दाऊदच्या मनात जो राग निर्माण झाला त्यातूनच दाऊद मोस्ट वॉंटेड अंडरवर्ल्ड डॉन बनला. दाऊद आधी हाजी मस्तानच्या गँगमध्ये काम करत होता. तिथं त्याचा प्रभाव वाढू लागला. नंतर त्याच्या गँगला डी-कंपनी नावाने संबोधलं जाऊ लागलं.

अन् दाऊद डॉन झाला!
दाऊद डी-कंपनीचा म्होरक्या होता. 90 च्या दशकात तर त्याची मुंबईत जबरदस्त दहशत होती. साल होतं, 1993 चं… दिवस होता 12 मार्चचा अन् स्थळ होतं देशाची आर्थिक राजधानी मुंबई… एकाच दिवशी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले. 11 ठिकाणी झालेल्या या बॉम्बस्फोटमध्ये 250 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या सगळ्या घटनेमागे एका डॉनचं नाव होतं. तो डॉन म्हणजे दाऊद इब्राहिम….

15 टोपणनावं अन् करोडोंचा व्यायसाय
दाऊद इब्राहिम हा मोस्ट वॉंडेट अंडरवर्ल्ड डॉन आहे. त्याची 15 टोपणनावं आहेत. दाऊद इब्राहिम, शेख दाऊद हसन, अब्दुल हामिद अब्दुल अजीज, अनीस इब्राहिम, अजीज दिलीप, दाऊद हसन शेख इब्राहिम कासकर, दाऊद इब्राहिम मेमन कासकर, दाऊद हसन इब्राहिम कासकर, दाऊद इब्राहिम मेमन, दाऊद साबरी, कासकर दाऊद हसन, शेख मोहम्मद इस्माइल अब्दुल रहमान, दाऊद हसन शेख इब्राहिम, शेख इस्माइल अब्दुल आणि हिजरत ही दाऊदची टोपणनावं आहेत.

Sunday, December 17, 2023

शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीला आला वेग ; कधी लागणार निकाल ...?वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीला आता वेग आला आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी अंतिम सुनावणीला आजपासून सुरुवात होत आहे. आजपासून पुढचे तीन दिवस सलग अंतिम सुनावणी घेतली जाणार आहे. दोन्ही गटाच्या वकिलांना दीड-दीड दिवस युक्तिवादासाठी वेळ देण्यात आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत आज युक्तिवाद करत आहेत. त्यामुळे लवकरच या प्रकरणाचा निकाल समोर येण्याची शक्यता आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल कधी येणार? वाचा…

निकाल कधी येणार?
मागच्या दीड वर्षांपासून शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अद्याप प्रलंबित आहे. या प्रकरणी आता सुनावणीला वेग आला आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणाचा निकाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे 20 डिसेंबरला अंतिम सुनावणी संपली. तर 10 जानेवारी 2024 रोजी नेमका निकाल कोणाच्या बाजुने लागणार? याकडे सर्वांचे लक्ष असेल.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठे बदल झाले. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. यामुळे ठाकरे विरूद्ध शिंदे असा संघर्ष उभा राहिला. अशातच ठाकरेंनी शिंदे यांच्या बंडाला कायदेशीर विरोध करण्याचं ठरवलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत ठाकरेंनी मागणी केली. ही लढाई कोर्टात गेली.
न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सूचना दिल्या आहेत. येत्या 31 डिसेंबरपर्यंत या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करून निकाल देण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत. त्यामुळे या बाबत निकाल कधी समोर येतो हे पाहावं लागेल.

राऊत म्हणाले…
ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी या सुनीवणीवर प्रतिक्रिया दिलीय. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी पुन्हा विलंब होईल. असा निर्णय घेताना पक्षांतराची चीड असावी लागते. पण मला तरी तशी चीड विधानसभा अध्यक्षपदी बसेलेल्या व्यक्तीकडे दिसत नाही, असं म्हणत राऊतांनी या सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे.

दारू पिऊन तुझ्या किडन्या सडल्या ; छगन भुजबळांची जरांगे पाटील यांच्यावर वादग्रस्त टीका ;...

वेध माझा ऑनलाइन। ओबीसी मेळाव्यातून मंत्री छगन भुजबळ  यांनी  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांवर दारु पिऊन किडन्या किडल्या अशी जहरी टीका भुजबळांनी केली आहे. भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेनी प्रत्युत्तर दिले आहे.   मी जन्मल्यापासून आतापर्यंत शरीराला दारू जरी शिवली असेल,तर मी जिवंत समाधी घेईल. माझी नार्को टेस्ट करा, असे मनोज जरांगे म्हणाले. उपोषण सोडताना जे ठरलं होतं ते उत्तर सरकारने प्रामाणिकपणे सभागृहात द्यावं आणि कायदा पारित करावा, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. 

मनोज जरांगे म्हणाले.  मी जन्मल्यापासून आतापर्यंत शरीराला दारू जरी शिवली असेल,तर मी जिवंत समाधी घेईल.  माझी नार्को टेस्ट करा ,आणि नाही आढळल्यास त्यांनी तरी समाधी घ्यावी. विरोध करणाऱ्यालाच माणूस बोलतो, म्हणून भुजबळला विरोध आहे. आमच्याकडेही त्यांची माहिती आहे.  मी जर काही सांगितलं तर ते सगळे सोडून हिमालयात जाईल. भुजबळांच्या दोन-तीन वाईट घटना मला पुराव्यासकट माहिती आहेत सरकारने उपोषण सोडताना त्यावेळी ठरलेले प्रामाणिकपणे सभागृहात उत्तर देऊन कायदा पारित करावा, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. स्वतंत्र आरक्षण टिकतच नाही, स्वतंत्र म्हणजे नेमकं कसं हे स्पष्ट करा, असे देखील जरांगे म्हणाले. 

भुजबळांना गोळ्या सुरू कराव्यात ते बधीर झालंय : जरांगे
गिरीश महाजनांनी भुजबळांना समजावून सांगावं. त्यांना येरवाड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून गोळ्या सुरू कराव्यात. ते पागल आणि बधीर झालंय. गोरगरीब छोट्या छोट्या ओबीसी समाजातील जातींचा त्याला शाप लागलाय, असे जरांगे म्हणाले. 
जाळपोळ करणाऱ्या समोर सरकार झुकतंय : छगन भुजबळ
सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे यांच्या भेटीला गेलं होतं. त्यावर देखील छगन भुजबळांनी भाष्य केलं आहे. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, सरकार किती झुकणार जरांगेसमोर. त्याच्या पाया पडतायत, त्याला विनंती करतायत. सरकारला धमकी देणाऱ्यासमोर, जाळपोळ करणाऱ्या समोर तुम्ही झुकताय, असं म्हणत भुजबळांनी सरकारवर भाष्य केलं.

पुतण्यावर आरोप , काकी मैदानात : संजय राऊत यांनी मानले आभार: काय म्हणाले राऊत...? वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन। दिशा सिलियन मृत्यूप्रकरणाची एसआयटी चौकशी होणार आहे. याबाबत आमदार नितेश राणेंकडून  सातत्याने आदित्य ठाकरेंवर आरोप केले जात आहेत. आदित्य ठाकरेंवरील आरोपावर बोलताना शर्मिला ठाकरे यांनी आदित्य असं काही करेल असं मला वाटत नाही. चौकशी तर कोणीही लावेल, अशी प्रतिक्रिया दिली होती,त्यानंतर आज खासदार संजय राऊतांनी शर्मिला ठाकरेंचे आभार मानले आहेत.  तसेच  आमदार अपात्रता सुनावणी लांबणीवर जाईल, पक्षांतराबाबत अध्यक्षांना चीड आहे असं वाटतं नाही, असे देखील राऊत म्हणाले. 

आदित्यवर सगळ्यांचा विश्वास आहे. आम्ही आभारी आहोत. भाजपला मदत झाली, असे संजय राऊत म्हणाले. मनसे लोकसभा निवडणूक तयारीवर बोलताना संजय राऊत म्हणाले. भाजपला मदत झाली पाहिजे यासाठी एमआयएम, काही आघाड्या फक्त हुकूमशाही विरोधात शिव्या देतात.  पण प्रत्यक्ष भूमिका घेत नाहीत.

Saturday, December 16, 2023

शरद पवार यांचाच मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध ; मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का? असं सुप्रिया सुळे देखील म्हणायच्या ; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

वेध माझा ऑनलाइन। पाच राज्याच्या निवडणुकीत आपला विजय होईल. देशाची सूत्र मोदींच्या हातात देणार असल्याचं लोकांनी ठरवलं आहे. देशाचा विकास फक्त मोदीच करू शकतात. राहुल गांधी यांनी सर्व राज्यात जाऊन सात गॅरंटी दिल्या होत्या. पण त्यांच्या सातही गॅरंटी लोकांनी नाकारल्या आहेत. लोकांनी फक्त आणि फक्त मोदींवरच विश्वास ठेवला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात मोदींची वेगळी क्रेडिबिलिटी निर्माण झाली आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाच सर्वाधिक विरोध होता. शरद पवार यांनीच मराठा आरक्षणाला आतापर्यंत विरोध केलेला आहे, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का? असं सुप्रिया सुळे म्हणायच्या. दोघांनाही मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नव्हतं. त्यांना समाजाला झुंजत ठेवायचं होतं, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी हा गंभीर आरोप केला आहे. मराठा आरक्षणाला शरद पवार यांनीच विरोध केला होता. त्यांच्या मनात असतं तर मंडल आयोग लागू झाला तेव्हाच त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं असतं. पण त्यांनी फक्त मराठा समाजाला झुंजवत ठेवायचं काम केलं. लोक आपल्याकडेच आले पाहिजेत हा त्यामागचा हेतू होता. मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का असं सुप्रिया सुळे महाविकास आघाडीचं सरकार असताना म्हणायच्या, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मंडल आयोगाला तुम्हीच विरोध केला
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. त्यावेळी मंडल आयोगाला शिवसेनेनेच विरोध केला होता. भुजबळ का बाहेर पडले होते? कारण त्यावेळी तुम्ही मंडल आयोगाला विरोध केला होता म्हणून. पण आपली भूमिका पक्की आहे. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात हा प्रयत्न सुरू आहे. कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही. ही आमची कमिटमेंट आहे, असं सांगतानाच कार्यकर्त्यांमध्ये जातीचे गट तयार होऊ देऊ नका. ओबीसी आणि मराठा समाजाच्या मनात तेवढीच कमिटमेंट हवी. मराठा समाजाला आम्ही न्याय देणार आहोत. पण ओबीसींवर अन्याय होऊ द्यायचा नाही. आरक्षण महत्त्वाचे आहे. पण गरीबीचे मागासलेपण दूर करत नाहीत, तोपर्यंत मागासलेपणाची भावना दूर होऊ शकत नाही, असंस फडणवीस म्हणाले.

तर त्यांची दुकाने बंद होतील
यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवरही टीका केली. विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवण्याचं ठरवलं. त्यासाठी 6 डिसेंबर रोजी बैठकही घेतली. पण त्या बैठकीला कोणीच गेलं नाही. या आघाडीसमोर कोणतंही ध्येय नाही. विकासाचं ध्येय नाही. मोदी हटाव हेच त्यांचं सूत्र होईल. मोदींना हटवलं नाही तर त्यांच्या कुटुंबांची दुकाने बंद होतील. त्यांचं कुटुंब म्हणजे देश आहे. तर मोदींसाठी देश म्हणजे कुटुंब आहे, असं फडणवीस म्हणाले.