वेध माझा ऑनलाइन ।विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालात अजित पवार यांनी भरघोस यश संपादन केलं. त्यांनंतर गुरुवारी झालेल्या शपथविधी सोहळ्यात अजित पवार यांनी तब्बल सहाव्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मात्र त्यानंतर अजित पवार यांना पुन्हा मोठा दिलासा मिळाला आहे. आयकर विभागानं 7 ऑक्टोबर 2021 ला अजित पवार यांच्या विविध कारखान्यांसह इतर अशी 1 हजार कोटीची मालमत्ता जप्त केली होती. या प्रकरणात अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बेनामी न्यायाधिकरणानं ही संपत्ती बेनामी नसल्याचं स्पष्ट करत अजित पवार यांना क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे हा अजित पवार यांना मोठा दिलासा असल्याचं बोललं जाते.
No comments:
Post a Comment