Sunday, December 22, 2024

धनंजय मुंडे यांना अटक करा ; मंत्रीमंडळातून हाकलून द्या;

वेध माझा ऑनलाईन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्री धनंजय मुंडे यांना अटक करावी आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी मराठा या पत्राद्वारे करण्यात आलीय. बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर बारामतीमध्ये शोक सभा तसेच घटनेचा निषेध करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. गुन्हेगारांचा नेता म्हणून धनंजय मुंडे यांना अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

मराठा क्रांती मोर्चाने पत्रात काय म्हटलंय? 

मराठा सरपंच बांधव कै. संतोष देशमुख यांचा परळी येथे नुकतीच निघुर्ण हत्या झाली. सदरची हत्या ही केवळ कै संतोष देशमुख हे मराठा समाजाचे आहेत व त्याचा सर्वात मोठा अडसर हा आपले पक्षाचे आमदार व मंत्री श्री धनंजय मुंडे या नेत्याला होत होता म्हणुन सदरील नेत्याने इतर गुंडामार्फत म्हणजेच वाल्मिक कराड व इतर यांचेमार्फत हत्या केलेचे दिसून येत आहे. त्यामुळे या हत्येमधील जेवढे गुन्हेगार व गुन्हेगारांचा नेता धनंजय मुंडे यांना तात्काळ अटक करावी. तसेच धनंजय मुंडे यांची मंत्री मंडळातुन हकालपट्टी करण्यात यावी व सदरील गुन्हांचा तपास जलद गतीने व्हावा, असं या पत्रात नमूद करण्यात आलंय.

No comments:

Post a Comment