वेध माझा ऑनलाइन।
हवेत गोळीबार करून व्हिडीओ काढणाऱ्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, परळी पोलिसांनी आज (दि.26) त्याला अटक केली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फड याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी ट्विट केला. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आता याच कैलास फडला परळी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान न्यायालयात हजर केले असताना कैलास फडला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शिवाय कैलास फड कडून परवानाधारक पिस्तूल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कैलास फड याचा हा व्हिडिओ असून शस्त्रपूजा केल्यानंतर हवेत गोळीबार करण्यात आला होता. हा व्हिडिओ जुना असला तरी आता सोशल माध्यमातून व्हायरल होत आहे. याच आधारावर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार परळी शहर पोलीस ठाण्यात कैलास फड याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.
No comments:
Post a Comment