वेध माझा ऑनलाइन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा शपथविधी सोहळा रविवारी (दि. 15) पार पडला. यामध्ये 33 कॅबिनेट तर 6 राज्यमंत्र्यांचा समावेश आहेत. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना डावलण्यात आल्याने ते कमालीचे नाराज झाले आहेत. छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट हल्लाबोल केलाय. आता यावरून मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
माणिकराव कोकाटे म्हणाले की, मला वाटत नाही की छगन भुजबळ नाराज असतील. ते 20 वर्षापासून मंत्री आहेत, त्यामुळे नाराज असण्याचे काही कारण नाही. त्यांचे काही गैरसमज असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण ते गैरसमज दूर होतील आणि लवकरात लवकर ते कामाला लागतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
छगन भुजबळ यांनी अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे तिघेच पक्षाचा निर्णय घेतात. आम्हाला पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत शून्य स्थान आहे, असे म्हटले. तसेच अजित पवारांना छगन भुजबळ यांनी टार्गेट केले. याबाबत विचारले असता माणिकराव कोकाटे म्हणाले की, ते चुकीचे आहे. अजित पवारांना टार्गेट करण्याची आवश्यकता नाही. अजित पवारांनी सर्वसमावेशक निर्णय घेतलेला आहे. सर्व समाजाच्या लोकांना त्यांनी न्याय दिला आहे. ज्या ओबीसी समाजाची आपण चर्चा करतो त्या ओबीसी समाजाज्याच्या 17 नेत्यांना मंत्रिमंडळ स्थान मिळाले आहे. तर 16 लोक मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे समाजावर अन्याय झाला असे म्हणता येणार नाही. अजित पवारांनी अतिशय योग्य केल आहे. अनेक नवीन लोकांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. दादांनी हे जाणीवपूर्वक करणे आवश्यक होते. त्यांनी काही चुकीचे केलेले नाही, असे माझे मत आहे.
No comments:
Post a Comment