कराड शहरासह दक्षिण विधानसभा मतदार संघाचा सर्वांगीण विकासाठी मी प्रयत्नशील आहे. शहरातील प्राचीन मंदिरे, वास्तू यांचे जनत व संवर्धन, वाहतूकीच्या समस्येसाठी नेकलेस रोड, नागरी सुविधा, आरोग्य सुविधा, पार्किंग, मिनी नवीन एमआयडीसीबाबत प्रामुख्याने काम करणार असून कराड व मलकापूर शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. परिपूर्ण असा आदर्श मतदारसंघ बनवण्याचे माझे स्वप्न आहे असे प्रतिपादन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले.
येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या विकासाचा मोठा आराखडा तयार करणार गरजेचे आहे. मतदार संघातील गावागावात स्वच्छ पिण्याचे पाणी, मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्ते, गावामध्ये बगीचा यासह सौउर्जा प्रकल्प उभारून गाव स्वावलंबी बनवण्याचा आराखडा तयार करणार आहे. हे करत असताना जे माझ्या सोबत त्यांना बरोबर घेणार आहे मात्र जे माझ्या सोबत नाहीत त्यांनाही बरोबर घेऊन गावचा विकास केला जाणार आहे. डोंगरी गावांचा डोंगरी विभागात समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रे व शहरातील उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. याबरोबर पंचायत समितीत नवीन इन्फ्रास्टकचर उभा करता येईल का यासाठीही प्रयत्न करणार आहे.
शहरातील वीर मारूती, जोतिबा मंदिर, कृष्णाबाई मंदिरासह प्राचीन मंदिरे व वास्तूंचे जतन व संवर्धनासाठी प्रयत्न करणार आहे. याचबरोबर मतदारसंघातील क वर्गातील देवस्थानांना ब वर्गामध्ये समाविष्ट करणे व ज्यांचे वगकरण झाले नाही त्या देवस्थानांना क वर्गाचा दर्जा देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
कराड शहराला भेडसवणाऱ्या वाहतुक समस्यासाठी नेकलेस रोडचा प्रस्ताव तयार केला जाणार असून पंकज हॉटेलपासून नदीलगतच्या गॅबिन भिंतीची उंची वाढवून त्यावरून रस्ता तयार करणार आहे. तसेच विटा व सांगलीकडे जाणारी वाहने शहरातून न येता त्यांना बाहेरूनच मार्ग देण्याची व्यवस्था केली आहे. जा याचबरोबर भविष्यकाळात खोडशीपासून कराडमध्ये येण्यासाठी पुल उभारण्याचा विचार आहे. यामुळे वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. याचबरोबर शहरामध्ये मल्टी लेव्हल पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी प्रस्ताव तयार करून निधीची मागणी करणार आहे.
कराडच्या एमआयडीसीमधील सध्याच्या उद्योजकांची बैठक घेणार आहे. जुन्या उद्योजकांचा आढावा घेऊन नवीन उद्योजकांना आमंत्रित करण्याचे नियोजन केले जाणार आहे. उद्योजकांच्या काय अपेक्षा आहेत ह्या प्रथम जाणून घेणार आहोत. त्यानंतर आहे त्या ठिकाणी काय बदल करावे लागतील ते केले जातील. मनुष्यबळ कोणत्या प्रकारचे लागतील हे जाणून घेणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत याच्याबरोबर विमानप्रवासामध्ये नवीन मिनी एमआयडीसी संदर्भात चर्चा झाली. सर्वोतोपरी सहकार्य करण्याचा शब्द त्यांनी दिला आहे. तसेच आयटी प्रकल्प आणण्यासंदर्भातही माझा प्रयत्न राहणार आहे.
पाटण कॉलनीमधील झोपडपट्टी असणाऱ्या आरक्षित जागेवरील पार्किंग असा उल्लेख काढून तेथे बेघरांना घरे असा उल्लेख करून तेथे अनेक वर्षांपासून वास्तव्यास असणाऱ्या लोकांना पक्की घरी मिळावेत अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. या वर मुख्यमंत्र्यांनी तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले आहेत. पाटण कॉलनी, स्टेडियम, मलकापूरातील परिसरातील झोपडट्टीवासीयांचे शंभर टक्के पुनर्वसन केले जाणार आहे. म्हाडाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक करून या ठिकाणी पक्की वसाहत तयार करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नगरीमध्ये एकही व्यक्ती बिनघराचा राहणार नाही यासाठी माझे प्रयत्न राहणार असून कराड व मलकापूर शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी येणाऱ्या काळात काम करणार आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.
No comments:
Post a Comment