सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर संचालक धोंडीराम जाधव, संजय पाटील, जे डी मोरे, सयाजी यादव, अविनाश खरात, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, बाबासो शिंदे, कार्यकारी संचालक महावीर घोडके, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष भगवानराव पाटील, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, वैभव जाखले, एम. के. कापूरकर, बाळासाहेब पाटील,डॉ.एस व्ही पाटील आदींसह मान्यवरांनी आप्पासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
आप्पासाहेबांच्या सहकारातील योगदानामुळे कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून कृष्णाकाठ समृद्ध झाला असल्याची भावना मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी जनरल मॅनेजर टेक्निकल बालाजी पबसेटवार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयात संचालक लिंबाजीराव पाटील, प्राचार्य डॉ. अशोक फरांदे यांच्या हस्ते स्व. जयवंतराव भोसले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment