वेध माझा ऑनलाइन।
कृष्णा कारखाना नेहमीच साखर उद्योगात होत असलेल्या बदलांचा स्विकार करून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत असतो. कारखान्यात या गळीत हंगामात शुगर सिरपपासून उत्पादित झालेल्या इथेनॉलचा पुरवठा ऑईल कंपन्यांना करण्यास सुरूवात झाली आहे. पहिल्या इथेनॉल टँकरचे पूजन चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करून, टँकर ऑईल कंपनीकडे रवाना करण्यात आला. या वर्षीही कृष्णा कारखान्याने १ कोटी लिटर्स इथेनॉलची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या दूरदृष्टीतून कारखाना कार्यस्थळावर शेतकरी वर्गाचे हित डोळ्यासमोर ठेवून साखरेसह पूरक उद्योगांची जोड देऊन, सभासद शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न कारखाना व्यवस्थापन करत आहे. केंद्र सरकारने इथेनॉलबाबत घेतलेले सकारात्मक धोरण, इथेनॉलला मिळणारा योग्य दर लक्षात घेऊन, कृष्णा सहकारी साखर कारखान्याने शुगर सिरपसपासून इथेनॉल निर्मिती सुरू केली. यावर्षी १ कोटी लिटर्स इथेनॉल उत्पादन निर्मिती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
यावेळी व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक धोंडीराम जाधव, गुणवंतराव पाटील, निवासराव थोरात, संजय पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, सयाजी यादव, जे डी मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, श्रीरंग देसाई, कार्यकारी संचालक महावीर घोडके, माजी संचालक गिरीश पाटील, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, वैभव जाखले आदींसह सर्व अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment