राज्यातील 288 आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर सोमवारी विधानसभेच्या नव्या अध्यक्षाची निवड होणार आहे. या पदावर पुन्हा एकदा भाजपच्या राहुल नार्वेकर यांची वर्णी लागणार आहे. राहुल नार्वेकर यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये मोठ्या कौशल्याने विधानसभेचे कामकाज हाताळले होते. ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या वादात राहुल नार्वेकर यांनी निर्णायक भूमिका बजावली होती. त्यामुळे आता राहुल नार्वेकर हेच विधानसभा अध्यक्ष होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment