वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बदनामीकारक पोस्ट्स करण्याच्या प्रकरणात राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. या प्रकरणात सायबर गुन्ह्याच्या अधिनियमांतर्गत 12 सोशल मीडिया प्रोफाइल्सविरुद्ध FIR नोंद करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांची बदनामी
सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध खोटे आणि बदनामीकारक व्हिडीओस आणि पोस्ट्स शेअर करणारे 12 सोशल मीडिया यूजर्सविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या प्रोफाइल्सने मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला धोका पोहोचवणारे आणि त्यांची प्रतिष्ठा धोक्यात आणणारे व्हिडीओ पोस्ट केेले होते. भाजपच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई करण्यात आली आहे.
सायबर गुन्ह्यासंदर्भात सरकारचं मोठं पाऊल
महाराष्ट्र सायबर सेलने या प्रकरणात लक्ष घातले आहे आणि संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना नोटिस पाठवली आहे. या नोटिसांमध्ये त्यांना बदनामीकारक पोस्ट तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारच्या या पावलामुळे सोशल मीडियावरून होणारी बदनामी आणि खोट्या बातम्यांवर आळा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या कारवाईच्या माध्यमातून सरकार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरील नियंत्रण वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून यासारख्या घटना पुन्हा घडू नयेत. हे पाऊल सोशल मीडियाचा योग्य वापर करण्यासाठी आणि नागरिकांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
No comments:
Post a Comment