Sunday, December 22, 2024

अर्थखाते अजितदादांकड!, मात्र खर्चाचे अधिकार एकनाथ शिंदेंकडे! - काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाईन
राज्य मंत्रिमंडळाचे बहुप्रतिक्षित खातेवाटप काल (21 डिसेंबर)ला जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि सामान्य प्रशासन (जीएडी), ऊर्जा (नवीनीकरण ऊर्जा वगळून), विधी व न्याय आणि माहिती-जनसंपर्क ही खाती असतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खात्यासह गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम-एमएसआरडीसी), तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व उत्पादन शुल्क खाते असणार आहे. तर महसूल खाते चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले आहे. 
देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे दुसऱ्या स्थानावर आहे. मंत्रिमंडळात भाजपनंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे महत्वाचे खाती आहेत. नगरविकास,गृहनिर्माण,सार्वजनिक बांधकाम खाती तसेच एमएमआरडी, सिडको, एमएसआरडीएवर एकनाथ शिंदे यांचाच ताबा राहणार आहे. राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधीही एकनाथ शिंदेंच्या हाती असणार आहे. अजित पवारांकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या असल्यातरी खर्चाचे सर्व अधिकार एकनाथ शिंदेंकडे राहणार आहे. 

No comments:

Post a Comment