Thursday, December 12, 2024

आता... भाजपचा अजितदादांच्या अर्थखात्यावर डोळा ;

वेध माझा ऑनलाइन।
राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ तर घेतली, पण अद्याप खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब मात्र झाल्याचं दिसत नाही. महत्त्वाची खाती आपापल्या पदरात पाडून घेण्यासाठी तीनही पक्षांची चढाओढ सुरू असतानाच आता एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. एकनाथ शिंदे यांना हवी असलेली गृह आणि नगरविकास ही दोन्ही खाती तसेच दादांकडील अर्थखातं आता भाजप आपल्याकडेच ठेवणार असल्याची माहिती आहे. त्या बदल्यात या दोघांना इतर खाती दिली जाणार असल्याची चर्चा आहे

विधानसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून भाजप मोठा पक्ष बनला आहे. तसेच त्यांना अपक्ष आणि छोट्या पक्षांचाही पाठिंबा आहे. त्यामुळे अर्थ, गृह आणि नगरविकास खाती ही भाजपकडेच राहावीत, ती राष्ट्रवादी वा शिंदेंच्या शिवसेनेला देऊ नयेत असा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे. सोमवार, 16 डिसेंबरपासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्या आधी म्हणजे 14 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा आहे.

No comments:

Post a Comment