रामराजे नाईक निंबाळकर हे नेमके कोणत्या पक्षात आहेत हे त्यांना स्वतःला देखील माहीत नसेल... मलातरी माहीत नाही... असे खोचक वक्तव्य आमदार आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी कराड येथे केले
मंत्रिपद मिळाल्यानंतर स्व यशवन्तराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते
रामराजे आणि त्यांच्या राजकीय संघर्षावर भाष्य करताना त्यांनी ही टिप्पणी केली दरम्यान रामराजे म्हणजे फलटण नव्हे असेही ते यावेळी म्हणायला विसरले नाहीत तरीदेखील आमच्यात संघर्ष नाही असेही ते यावेळी म्हणाले...
यावेळी बोलताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले ,उदयनराजे यांच्यासह अतुलबाबा मनोज घोरपडे,जयकुमार गोरे आणि मी... आम्ही एकमेकाला मदत करण्याचे धोरण स्वीकारले त्यामुळे जिल्ह्यात आज 4 मंत्री महायुतीच्या काळात दिसत आहेत राष्ट्रवादी च्या सत्तेच्या काळात स्व अभयसिहराजे यांच्यावर अन्याय झाला त्यांना मंत्रिपदापासून वंचीत ठेवले गेले अन्यथा जिल्ह्याच्या विकासात अधिक भर पडलेली दिसली असती
माझा आणि उदयनराजे यांचा संघर्ष हा केवळ स्थानिक राजकारणात कधीतरी दिसला असेल एखाद्या कार्यकर्त्याच्या वार्डातील उमेदवारीवरून तो दिसला असेल मात्र ते आमचे खासदार आहेत मार्गदर्शक आहेत आम्ही त्यांना खासदार करण्याकरिता प्रयत्न केलेत त्यांनीही माझ्यासाठी प्रयत्न केले आहेत त्यामुळे आमच्यात संघर्ष आहे असे म्हणता येणार नाही असेही शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले
दरम्यान,या दोन्ही मंत्र्यांनी सातारा जिल्ह्यासाठी आपले विकासात्मक व्हिजन असल्याचे सांगून जिल्ह्याची प्रगती अधिकाधिक व्हावी यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही यावेळी सांगितले
No comments:
Post a Comment