वेध माझा ऑनलाइन।
अमरावती भिवंडी छत्रपती संभाजीनगरसह 17 शहरांमध्ये एनआयए म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापे टाकलेत. एनआयने अमरावतीच्या छायानगर मधून एकाला आणि भिवंडीच्या खोणी खार पाडीमधून दोघेजण ताब्यात घेण्यात आले आहेत. ताब्यात घेण्यात आलेले 3 तरुण पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबतची माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपास भागात असलेल्या एनआयए ने 22 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलंय. भिवंडीतील खोणी खार पाड ग्रामपंचायत परिसरातून 45 वर्षीय कामरान अन्सारीला ताब्यात घेण्यात आलंय. याशिवाय अमरावतीतील छायानगरमधून 35 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या एनआयएकडून तिघांची कसून चौकशी सुरु आहे. ताब्यात घेतलेल्या तरुणांचा देशविरोधी कारवाया करणाऱ्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेसोबत संबंध असल्याचा संशय आहे.
No comments:
Post a Comment