वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा करिश्मा पाहायला मिळाला. यापूर्वी, मध्य प्रदेश सरकारनेही लाडली बहनाच्या माध्यमातून महिला वर्गास दरमहा 1200 रुपये देण्याची योजना सुरू केली होती. अर्थातच, राज्यात पुन्हा एकदा भाजपचं सरकार स्थापन झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे, महिला मतदार हा गेमचेंजिंग फॅक्टर ठरत असल्याचं दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुढील वर्षात होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या अगोदरच राजधानी दिल्लीतील केजरीवाल सरकारने महिलांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. येथील लाडक्या बहिणींना म्हणजे प्रत्येक महिलांना दरमहा 1000 रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. दिल्लीत पुढील वर्षात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज दिल्ली सरकारने महत्वाकांक्षी आणि मोठ्या योजनांची घोषणा केली. त्यामध्ये, महिलांना दरमहा 1000 रुपये देण्याची सर्वात मोठी घोषणा केजरीवाल सरकारने केली आहे
No comments:
Post a Comment