Thursday, December 12, 2024

शिवेंद्रसिंहराजे भोसले होणार साताऱ्याचे पालकमंत्री!

वेध माझा ऑनलाइन
विधानसभेच्या निवडणुकीत भाजप महायुतीला मोठे यश मिळाले आहे. सर्वाधिक जागा मिळवून भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. सातारा जावळी भाजपचे आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे ही विक्रमी मतांनी निवडून येऊन पाचव्यांदा विधानसभेत गेले आहेत. यंदाच्या निवडणुकीत उदयनराजे व शिवेंद्रराजे यांनी एकत्र येऊन मनोमिलन केले. दोघांनीही जिल्ह्यात सर्व उमेदवारांचा प्रचार करून राष्ट्रवादीच्या बालेकिल्लाला सुरुंग लावून भाजपसह महायुतीला मोठे यश मिळवून दिले आहे. 

विधानसभेच्या निकालानंतर मुख्यमंत्रि‍पदापासून मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युलावर देखील महायुतीमध्ये चर्चा सुरु झाली आहे.गेले कित्येक वर्षापासून सातारा तालुका हा मंत्री पदापासून वंचित आहे. लोकसभा निवडणुकीनंतरही उदयनराजे यांनी स्वतःहून केंद्रीय मंत्रीपद नाकारले होते.परंतु खासदार उदयनराजे स्वतः शिवेंद्रराजे यांच्या मंत्री पदासाठी आग्रही आहेत.उदयनराजे मुंबई येथे जाऊन महायुती मधील नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. शिवेंद्रराजे यांना कॅबिनेट मंत्रीपदासहित सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळावे अशी मागणी करण्यात येत आहे.दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी राजीनामा सोपवल्यामुळे नवीन सरकारच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार असून आजच शिवेंद्रसिंहराजे यांचे नाव मंत्रिमंडळामध्ये निश्चित होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

No comments:

Post a Comment