वेधमाझा ऑनलाइन।
शपथविधीचं काऊंटडाऊन सुरू झालंय आणि महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. काल संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगला गाठत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांशिवाय इतर कुणीच नव्हतं. जवळपास 40 ते 45 मिनिटं ही बैठक चालली. या बैठकीनंतर गृह खात्यासाठी एकनाथ शिंदे आग्रही असले तरी हे खातं देवेंद्र फडणवीसांकडेच राहणार असल्याचं सूत्रांच्या माहितीनूसार समोर आलं आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काल झालेल्या बैठकीत देखील मंत्रिपदावर देखील अंतिम तोडगा निघाला नसल्याचं कळतंय. त्यामुळे आज पुन्हा एकदा बैठक होण्याची शक्यता आहे. गृहमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहावे, यासाठी भाजपचा आग्रह आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदासह नगरविकास खात्यासह अजून एक कोणतं तरी खातं घ्यावं, असा प्रस्वात भाजपकडून ठेवण्यात आल्याचं कळतंय. आज पुन्हा यावर एक बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या शपथविधी असताना आजतरी मंत्रिपदाचा प्रश्न सुटणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाच्या नावावर आज होणार शिक्कामोर्तब आहे. भाजप केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. त्यानंतर भाजपकडून मुख्यमंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल
No comments:
Post a Comment