वेध माझा ऑनलाइन
मंत्रिमंडळात डावलल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ प्रचंड नाराज झाले आहेत. मंत्रीमंडळ विस्तारानंतर ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सतत टीका करताना दिसून येत आहेत.नाराज भुजबळ आता कोणती मोठी भूमिका घेणार याबाबत चर्चा सुरू असतानाच त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीने आता वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलंय. दरम्यान, याबाबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक खुलासा केला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भुजबळ साहेबांनी माध्यमांना आमच्यातल्या चर्चांबद्दल सांगितलं आहे, त्यामुळे मला वेगळी माहिती द्यायची गरज नाहीये. पुढे ते म्हणाले की, भुजबळ साहेब महायुतीचे नेते आहेत, आणि राष्ट्रवादीचे असल्यामुळे त्यांचा तिथे सन्मान आहे. मात्र, आम्हा तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या मनात त्यांच्याबद्दल सन्मानाची भावना आहे.यावेळी छगन भुजबळांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही?, असा प्रश्न देखील फडणवीसांना विचारण्यात आला. ते म्हणाले की, भुजबळांना अजित पवारांनी मंत्रीमंडाऴात घेतलं नाही. यामागे भुजबळांना डावलन्याचा अजित पवारांचा कोणताच हेतू नव्हता.
एवढंच नाही तर, अजित पवारांनी मला सांगितलं की, आम्हाला त्यांना राष्ट्रीय पातळीवर पाठवायचं आहे, असं फडणवीसांनी सांगितलं.
No comments:
Post a Comment